Goa AAP Protest Dainik Gomantak
गोवा

Porvorim Mapusa: सरकारचे 'साबांखा' खाते गुंडाळून ठेवण्याची गरज! पर्वरी-म्हापसा रोडवरून आप आक्रमक; बाईक राईड काढून निषेध

Goa AAP Protest: अमित पालेकर म्हणाले की, सरकारचे साबांखा खाते हे गुंडाळून ठेवण्याची गरज आहे. तसेच जे अभियंते आहेत, त्यांच्यावर फौजदारी गुन्हे नोंद करावेत.

Sameer Panditrao

म्हापसा: राज्यातील सर्वच रस्त्यांची दुरवस्था झाल्याने नागरिकांना मोठ्या त्रासाला तोंड द्यावे लागते. अशावेळी शनिवारी, ‘आप’तर्फे पर्वरी (खापरेश्वर मंदिर) ते म्हापसा (श्री बोडगेश्वर मंदिर) या मार्गावर ‘बाईक राइड’ने या रस्त्यांची दुरवस्था प्रत्यक्ष अनुभवावून निद्रिस्त भाजप सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. यावेळी आपचे राज्य निमंत्रक अमित पालेकर, आमदार व्हेंन्झी व्हिएगस, वाल्मिकी नायक, श्रीकृष्ण परब आदी उपस्थित होते.

दरम्यान, या बाईक राईडचे आमंत्रण ‘आप’ने सर्व आमदारांना दिले होते. मात्र, ‘आप’चे बाणावलीचे आमदार व्हेन्झी व्हिएगस हेच हजर होते. तर ‘आप’चे वेळ्ळीचे क्रुज सिल्वा हे बाहेरगावी असल्याने हे हजर राहू शकले नाहीत, असे पालेकरांनी यावेळी नमूद केले.

अमित पालेकर म्हणाले की, सरकारचे साबांखा खाते हे गुंडाळून ठेवण्याची गरज आहे. तसेच जे अभियंते आहेत, त्यांच्यावर फौजदारी गुन्हे नोंद करावेत. या मार्गावरील रस्त्यांसाठी कोट्यवधी रुपये मंजूर झाले होते, हे पैसे कुठे गेले?

असा सवाल त्यांनी उपस्थित केला. किमान चतुर्थीपूर्वी झोपलेल्या सरकारला जाग यावी व गणरायाने या सरकारला चांगली बुद्धि द्यावी व गणेश चतुर्थीपूर्वी रस्त्यांची मलमपट्टी व्हावी यासाठीच हा उपक्रम होता, असेही ते म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Formula Racing Scam: वीजबिलांचा भार जनतेवर; मोपा येथे महाघोटाळा, सवलतींचा वर्षाव इव्हेंटवर, काँग्रेससह इतर विरोधी पक्षांनीही केला आरोप

Goa Politics: 'आरजी'चा फुटबॉल वीरेशच्या हाती; राष्ट्रीय अध्यक्ष या नात्याने तडकाफडकी राज्य समित्या बरखास्त

Sanjil Kudchadkar Kidnapping Case: कोंब-मडगाव परिसरातील घटनेमुळे खळबळ; कौटुंबिक वादातून पॅथॉलॉजी लॅबचालकाचे अपहरण

Maharashtra FDA Action: तुकाराम मुंढेंचा बॉलिवूडला दणका! गुटख्याची जाहिरात करणाऱ्या सेलिब्रिटींवर होणार कारवाई; एफडीए ॲक्शन मोडवर

Himachal Pradesh Landslide: हिमाचलमध्ये भीषण अपघात! चालत्या सुमोवर कोसळली दरड; 13 प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू

SCROLL FOR NEXT