Amit Palekar Resigns Dainik Gomantak
गोवा

झेडपीत अपयशानंतर विधानसभेपूर्वी गोव्यात केजरीवालांना जोर का झटका; अमित पालेकर काँग्रेसच्या वाटेवर, हंगामी अध्यक्षासह पक्षाला केला रामराम

Amit Palekar Resigns AAP Goa: नुकत्याच पार पडलेल्या जिल्हा पंचायत निवडणुकीच्या निकालानंतर गोव्यातील आम आदमी पार्टीला मोठा धक्का बसला.

Manish Jadhav

पणजी: गोव्यात नुकत्याच पार पडलेल्या जिल्हा पंचायत निवडणुकीत आम आदमी पार्टीला मोठा धक्का बसला होता. त्यानंतर आप प्रदेशाध्यक्ष पदावरुन अमित पालेकरांची तात्काळ उचलबांगडी करण्यात आली होती. तेव्हापासून पालेकर पक्षाला रामराम ठोकू शकतात असा कयास लावला जात होता.

अखेर पालेकरांनी सोमवारी (5 जानेवारी) 'आप'च्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला. केवळ पालेकरच नव्हे, तर त्यांच्यासोबत पक्षाचे प्रभारी प्रदेशाध्यक्ष श्रीकृष्ण परब आणि इतर पदाधिकाऱ्यांनीही आपले राजीनामे सोपवल्याने गोव्याच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली. हा सामूहिक राजीनामा 'आप'साठी एक मोठा 'सेटबॅक' मानला जात आहे.

'मी रागातून निर्णय घेतला नाही'

पालेकर यांनी आपल्या राजीनाम्याची अधिकृत घोषणा करताना अत्यंत भावनिक आणि राजकीय भूमिका मांडली. त्यांनी स्पष्ट केले की, "मी हा निर्णय कोणत्याही रागातून किंवा घाईघाईत घेतलेला नाही. माझा हा निर्णय वैयक्तिक स्वाभिमान आणि विचारांच्या स्पष्टतेसाठी आहे. माझ्या लोकांचा आणि कार्यकर्त्यांचा विचार करुन मी हा निर्णय घेतला."

जिल्हा पंचायत निवडणुकीत पक्षाला अपेक्षित यश मिळाले नाही. विशेषतः सांताक्रूझ मतदारसंघात आणि इतर महत्त्वाच्या भागांमध्ये पक्षाची कामगिरी खालावल्याने अंतर्गत नाराजी वाढली होती. पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाकडून स्थानिक नेतृत्वावर दबाव किंवा निर्णय प्रक्रियेत होणारी दिरंगाई हेदेखील या राजीनाम्यामागचे एक कारण असल्याचे बोलले जात आहे.

काँग्रेसमध्ये जाणार का? तर्कवितर्कांना उधाण

दरम्यान, अमित पालेकर (Amit Palekar) यांनी 'आप' सोडल्यानंतर त्यांच्या पुढील राजकीय वाटचालीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. राजकीय गोटात अशी जोरदार चर्चा आहे की, पालेकर लवकरच काँग्रेसमध्ये प्रवेश करु शकतात. गेल्या काही दिवसांपासून ते काँग्रेसच्या स्थानिक आणि केंद्रीय नेत्यांच्या संपर्कात असल्याचे सूत्रांनी सांगितले. मात्र पालेकर यांनी अद्याप यावर अधिकृत भाष्य केले नसले तरी, सांताक्रूझ मतदारसंघातील त्यांचे कार्यकर्ते काँग्रेसकडे झुकत असल्याचे चित्र दिसत आहे. जर पालेकर काँग्रेसमध्ये गेले, तर काँग्रेसची ताकद मोठ्या प्रमाणावर वाढेल आणि आगामी विधानसभा निवडणुकीत पक्षाला मोठे बळ मिळेल.

'आप'ची संघटनात्मक बांधणी धोक्यात

आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी अमित पालेकर यांच्यासोबत श्रीकृष्ण परब (विद्यमान प्रभारी अध्यक्ष) यांनीही राजीनामा दिल्याने पक्षाची नेतृत्व फळी पूर्णपणे विस्कळीत झाली आहे. जिल्हा पंचायत निवडणुकीच्या निकालांनी 'आप'च्या विस्ताराच्या स्वप्नांना ब्रेक लावला असतानाच या दिग्गज नेत्यांच्या बाहेर पडण्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. कार्यकर्त्यांच्या मते, पक्षाने स्थानिक नेत्यांना विश्वासात घेऊन निर्णय घेण्याची गरज होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Grah Gochar 2026: 1 सप्टेंबरला बनणार 6 शक्तिशाली राजयोग! 'या' राशींची तिजोरी पैशांनी भरणार; होणार अफाट धन वर्षाव

Weather Update: ऑगस्टमध्ये समाधानकारक पाऊस, सर्वाधिक वाळपईत; जुलैमधील पावसाचा तुटवडा मात्र कायम

Marcel Road Issue: माशेलात 'वर्दळीचा' रस्ता धोकादायक, खड्ड्यांमुळे वाहतुकीला अडथळा; पावसात दुचाकीस्वारांसमोर मोठे संकट

Panaji: थकीत घरपट्टीचा फटका भाडेकरूंना; उत्पन्नाचा दाखला मिळविताना भाडेकरूंच्या मुलांची मोठी कसरत

Police Attack Viral Video: पीएसआयचा गळा आवळला, लोखंडी साखळीने हल्ला... लखनऊमध्ये अतिक्रमण हटवताना राडा; दोन महिलांसह 6 जणांना बेड्या

SCROLL FOR NEXT