Goa Utsav: राज्याच्या ग्रामीण भागांतील पारंपरिक लोककला, संस्कृती, खेळ, वनौषधी तसेच शेती व आधुनिकता यांची सांगड घालून शेतीचा विकास करण्याचे दर्शन घडविणारा ‘लोकोत्सव 2022’ 7 ते 11 डिसेंबर असे 5 दिवस आमोणे-पैंगीण येथील आदर्श ग्राम येथे होणार आहे.
गावडोंगरी येथील आदर्श युवा संघ तसेच कला व संस्कृती संचालनालय यांच्या संयुक्त विद्यमाने या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. लोकोत्सवाचे उद्घाटन देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी लोकसभा सभापतीही उपस्थित राहणार आहेत.
तवडकर म्हणाले की, हा लोकोत्सोव ग्रामीण संस्कृतीचे दर्शन व प्रसार करणारा आहे. ग्रामीण समस्यांचे सामूहिकरित्या चिंतन करणारे माध्यम तसेच संस्कृतीचे दर्शन घडविणारे व्यासपीठ आहे. सुमारे 500 हून अधिक ग्रामीण भागातील लोकांची दालने त्यात असतील.
अन्य राज्यांतील दालनांनाही संधी व लोककला, संस्कृतीचे दर्शन घडविण्याची संधी देण्यात येणार आहे. या पत्रकार परिषदेला संघाचे सचिव अशोक गावकर, खजिनदार दामोदर वेळीप व सदस्य रुपेश तवडकर उपस्थित होते.
कार्यक्रमांचे आकर्षण
पारंपरिक लोककला: फुगडी, धालो, गोफ, तालगड, तोणयामेळ, समईनृत्य.
पारंपरिक खेळ: लंगडी, लगोऱ्या, खो-खो व कबड्डी.
वनौषधी प्रदर्शन-विक्री.
इतर राज्यांतील लोकपथकांचे सादरीकरण.
रानभाज्या व त्यांचे महत्व याची माहिती.
शेती अवजारांचे प्रदर्शन.
साहसी उपक्रम व विज्ञान प्रदर्शन.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.