Amit Palekar  Dainik Gomantak
गोवा

केजरीवाल यांचा माझ्यावर विश्वास, बाणस्तारी अपघाताबाबत पालेकरांचं स्पष्टीकरण

सिंधुदुर्गचीही जबाबदारी : दिवाळीदरम्यान केजरीवाल गोव्याच्या दौऱ्यावर

गोमन्तक डिजिटल टीम

Amit Palekar मागील काही दिवसांपासून चर्चेत असलेले 'आप'चे अमित पालेकर यांचे कार्यक्षेत्र वाढवून त्यांना आता सिंधुदुर्गातही संघटनात्मक कामावर लक्ष देण्यास सांगितले आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या निवासस्थानी मंगळवारी (ता.१२) सायंकाळी ६.३० वाजता अडीच तास झालेल्या बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.

बैठकीत बाणस्तारी अपघातात प्रकरणी चर्चा झाली का, असे पालेकरांना विचारल्यावर ते म्हणाले, केजरीवाल यांचा माझ्यावर विश्वास आहे. त्यांनी तुम्ही जे केले असेल ते योग्यच असेल असे सांगत याविषयाची चर्चा अधिक वाढवली नाही.

याशिवाय दिवाळीदरम्यान केजरीवाल यांच्यासह राघव चढ्ढा, आतिशी आदी नेते गोव्याच्या दौऱ्यावर येण्याचे नियोजन या बैठकीत करण्यात आले आहे.

या बैठकीनंतर पालेकर यांनी ‘दै. गोमन्तक’ला सांगितले, की प्रामुख्याने संघटनात्मक बाबींवर चर्चा करण्यासाठी ही बैठक झाली. संघटनात्मक पातळीवर हाताळण्याचे मुद्दे, लोकांसमोर कोणते मुद्दे घेऊन जायचे आहेत, याविषयी चर्चा केली.

त्यादृष्टीने स्थानिक पातळीवर केलेल्या तयारीचा आढावा घेण्यात आला. गोवा राज्य प्रभारी म्हणून दीपक सिंघला, सहप्रभारी म्हणून चेतन रावल यांच्याकडे जबाबदारी देण्यात आली आहे. पंजाबमधील नेते सतबीर हे समन्वयक म्हणून पाहणार आहेत.

लोकसभा निवडणूक लढवण्याच्या तयारीचा आढावाही घेण्यात आला. पक्षाने ही निवडणूक स्वतंत्रपणे लढवावी की नाही याचा निर्णय ‘इंडिया’ आघाडीच्या जागा वाटप बैठकीनंतर घेतला जाणार आहे.

पक्ष राष्ट्रीय पातळीवरचा असल्याने काही निर्णय हे दिल्लीत घेतले जातील. या बैठकीला सिद्धेश भगत, सर्फराज अंकलगी, संदीप पाठक आदी उपस्थित होते.

पक्षाची राज्य कार्यकारिणी येत्या आठवडाभरात जाहीर केली जाणार आहे. संघटनात्मक कामाला बळकटी देण्यासाठी योग्य अशा व्यक्तींना कार्यकारिणीत स्थान देण्याचे बैठकीत ठरले आहे. - ॲड. अमित पालेकर, ‘आप’चे राज्य संयोजक

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pooja Naik Case: ‘देवच काय ते बघून घेईल’! ढवळीकर समर्थक आक्रमक; मंदिरात घातले गाऱ्हाणे, पूजा नाईकच्या वक्तव्याचा जोरदार निषेध

Banyan Tree Replanting: ..वृक्षवल्ली आम्हा सोंयरे! 'तो' वटवृक्ष वाचवला; बीट्स पिलानीलगतच्या रस्त्याकडेला केली पुनर्लागवड

Goa Live News: पर्वरी येथे 'रेंट-अ-कार' आणि टुरिस्ट टॅक्सीचा अपघात; वाहनांचे मोठे नुकसान

Illegal Club House Margao: 'हा कशाचा विकास'? मडगाव येथे भर रस्त्यावरच उभारले ‘क्लब हाऊस’; काँग्रेस आक्रमक

Goa ZP Election: गोवा फॉरवर्डने फोडला प्रचाराचा नारळ! कोलवाळ, हळदोणे, शिरसईत नारीशक्तीचे वर्चस्‍व; सत्तरीतील मतदारसंघांत मोर्चेबांधणी

SCROLL FOR NEXT