पणजी: म्हापसातील (Mapusa) स्थानबध्दता केंद्रात दहा नाजेरियन नागरिकांनी (Nigerian citizen) धुमाकूळ घातला आहे. त्यांनी तेथे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना कोंडून ठेवले त्यानंतर पोलिसांनी यात हस्तक्षेप केल्यानंतर कर्मचाऱ्यांची सुटका केली.
या केंद्रात सध्या 12 पुरुष, 9 महिला असे सर्व मिळून 21 नागरिक आहेत. त्यामध्ये हे 10 नाजेरियन नागरिक एक-दीड वर्षांपासून केंद्रात आहेत. या नाजेरियन नागरीकांना त्यांच्या देशात परत पाठविण्याची प्रकिया संथगतीने सुरु असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. आमची कागदपत्रे पूर्ण असूनही आम्हाला अद्याप आमच्या मायदेशी का पाय़विले जात नाही. सरकार वेळकाढूपणा करत आहे. असा अरोपही त्यांनी केला आहे. त्यामुळे त्यांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला असून, या आधी देखील उपोषणास्त्र उगारले आहे. बुधवारी दुपारपासून त्यांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली. त्यातत त्यांनी स्थानबध्दता केंद्राच्या दरवाजाला कडी लावत दरवाज्यातच धरणे आंदोलन केले. केंद्रात असणाऱ्या कर्मचाऱ्याना त्यांनी रात्री 10 वाजेपर्यंत कोंडून ठेवले.
या घटनेची माहिती मिळताच पोलीस तेथे दाखल झाले आणि त्यांनी या आंदोलकांना समजाविण्याचा प्रयत्न केला. पण जोवर विदेशी नागरिक नोंदणी विभागाचे आणि केंद्राचे अधिकारी हे चर्चा तोवर आमचे आंदोलन मागे घेणार नाही. त्यानंतर विदेशी नागरिक नोंदणी विभागाने शेवटी उत्तर गोवा पोलिसांच्या मदतीने मध्यस्थी करत, त्यांचे आंदोलन मोडीत काढण्यासाठी अतिरिक्त पोलीस बळाची मागणी केली. त्यानंतर पोलीस आधिकाऱ्यांनी समजूत काढत रात्री 10.30 च्या सुमारास केंद्रातील कर्मचाऱ्यांची सुटका करत दहा तास चाललेल्या या नट्यावर पडदा पडला
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.