नगरसेवक महादेव विष्णू डीचोलकर यांच्या घरी अकरा दिवसाचा गणपती बाप्पा
नगरसेवक महादेव विष्णू डीचोलकर यांच्या घरी अकरा दिवसाचा गणपती बाप्पा Danik Gomantak
गोवा

Goa: सार्वजनिक गणपती बाप्पा अकरा दिवस पूजनाची प्रथा

दैनिक गोमन्तक

दाबोळी: गोव्यात सार्वजनिक गणपती बाप्पा हे अकरा दिवस पुजले जातात. पण मुरगाव सडा भागातील सरास रहिवाशी हे आपल्या घरी गणपती बाप्पा अकरा दिवस पूजन करतात. काही रहिवासी अकरा दिवस गणेश पूजन गेल्या पन्नास वर्षांपासून आज तागायत करीत आलेले आहे.

मुरगांव सडा (Murgaon Sada)भागातील रहिवासी आपल्या निवासस्थानी अकरा दिवसीय गणेश चतुर्थी साजरी करण्याची परंपरा गेल्या पन्नास वर्षांपासून करीत आलेले आहेत. यात लक्ष्मण नारायण नाईक व स्व. विष्णू डिचोलकर (Late. Vishnu Dicholkar)यांच्या निवासस्थानी त्यांच्या घरी वडिलोपार्जित अकरा दिवसीय गणपती पन्नास वर्षापासून पुजत आहे. सडा भागातील नागरिक हे मुरगाव बंदरात काम करीत असल्याने बहुतेक नागरिक गणेश चतुर्थी साजरी करण्यासाठी आपल्या मूळ गावी जातात. तर काही नागरिक महाराष्ट्र, कारवार, होन्नावर येथे आपल्या गावी चतुर्थी साजरी करण्यासाठी जातात. सडा वासियांचे ग्रामदेव श्री ईश्वटी ब्राह्मण लक्ष्मीनारायणाच्या आशीर्वादाने येथील गणेश भक्त मोठ्या उत्साहाने गणेश चतुर्थी साजरी करीत आहे.

सडा भागातील रहिवाशी दीड, पाच, सात तर येथील मुरगावचा राजा सार्वजनिक गणपतीचे नऊ दिवसांनी विसर्जन केले जाते. मुरगाव सडा भागात अंदाजे वीस पेक्षा जास्त रहिवासी आपल्या निवासस्थानी गणेश चतुर्थी अकरा दिवसीय (Eleven days)गणपतीचे पूजन करीत आहे. यात लक्ष्मण नारायण नाईक, महादेव विष्णु डिचोलकर, अरुण भोळे, शेखर श्रीपाद मांद्रेकर, विजय चोडणकर, संजय फटजी, कांता मांद्रेकर, कृष्‍णा रघुनाथ केरकर, अशोक पालकर, शिवराम रेडकर, अमोल केरकर, दीनानाथ आरोसकर, राजेश जांभळे, विद्याधर दिवकर, कमलाकांत केरकर, रामा खाजनेकर, प्रभाकर गवस, गजानन नेरुलकर व इतरांच्या निवासस्थानी अकरा दिवसीय गणपती पुजला जातो.

सडा भागातील काही रहिवाशांनी आपल्या निवासस्थानी अकरा दिवसीय गणपती साजरी करण्यामागे एक कारण म्हणजे, वेर्णा ते मुरगाव बंदरापर्यंत होणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग करण्यासाठी सडा भागातील अंदाजे ५० पेक्षा जास्त घरांना धोका निर्माण होणार होता. यामुळे भागातील रहिवाशी आपले घर महामार्ग करण्यासाठी पाडणार या भीतीने दरवर्षी गणेश चतुर्थी 'श्री' चरणी आमची घरे जाण्यापासून रोखावे म्हणून श्री चरणी साकडे घालीत होते. अखेर श्रींच्या कृपेने राज्य सरकार व मुरगाव पत्तन न्यास (MPT) यांच्या संयुक्तपणे झालेल्या बैठकी सडा भागातील घरे महामार्गासाठी पाडण्यात येणार नसल्याचे जाहीर केले. तेव्हापासून सडा भागात गणेशभक्तांची बाप्पावरील श्रध्दा वाढली आणि त्यांनी अकरा दिवसीय गणेश चतुर्थी साजरी करण्याचा मनोदय बाळगून आपली श्रींची सेवा अविरत चालू ठेवली आहे. श्रींच्या कृपादृष्टीमुळे सडा भागातील महामार्गापासून घरे पाडण्यापासून वाचवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. ती माजी मुख्यमंत्री स्व: मनोहर पर्रीकर (Late Manohar Parrikar)यांच्या कुशल नेतृत्वामुळे यात स्थानिक आमदार तथा नगरविकास मंत्री मिलिंद नाईक (Minister Milind Naik)यांचाही मोलाचा वाटा होता. या भागातील रहिवासी गणेश चतुर्थी काळात आवर्जून माजी मुख्यमंत्री (CM)स्व: मनोहरभाई पर्रीकर यांची आठवण करून देतात. माजी मुख्यमंत्री पर्रीकर यांच्या प्रयत्नांमुळे आज सडा भागातील गणेश भक्त आनंदाने गणेश चतुर्थी साजरी करीत असल्याचे ते छातीठोकपणे सांगतात.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Vegetable Prices Update: राज्यात फळभाज्यांचे दर भडकले, लसूण 320 रुपये किलो; सर्वसामान्यांना महागाईचे चटके

Holy Spirit Feast In Margao: होली स्पिरिट चर्चच्या फेस्ताची सुरवात; मडगाव पालिकेचे 35 लाख महसुलाचे लक्ष्य

Egg Prices Increased: गोव्यात मासळीपाठोपाठ आता बॉयलर अंड्यांचे भाव गगनाला भिडले; दरातील चढउतार सुरूच

Kushavati River: केपेतील ‘कुशावती’चे पाणी प्रदूषित; ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात!

Goa Crime News: भागीदारीसाठी गुंतवलेल्या पैशांमध्ये केली अफरातफर; कळंगुट पोलिसांनी सहाजणांविरुद्ध नोंदवला गुन्हा

SCROLL FOR NEXT