Goa तील चावडी बाजारात परराज्यातील विक्रेते ढोलकी विकताना  दैनिक गोमन्तक
गोवा

Goa: पारंपारिक घुमटाला पर्याय ?

Goa राज्यातील घुमटाची निर्मिती घटल्यामुळे परराज्यातील विक्रेते ढोलकी विकताना दिसतात

सुभाष महाले

Goaच्या वाद्य संस्कृतीत घुमटाला (Ghumat) फार वर्षांपासून अन्यन साधारण महत्व आहे. मात्र घुमटाला घोरपडीची चामडी (Wild Lizard Skin) लागते. मात्र गेल्या काही वर्षांपासून वनखात्याने या चामड्याच्या वापारावर घोरपडीच्या संवर्धनासाठी बंदी (Prohibition for Wild Lizard Conservation) घातली मात्र त्याला पर्याय दिला नाही. मात्र राज्यात घोरपडीच्या चामड्याऐवजी बकरीच्या चामड्याचा (Goat Skin) वापर करण्याचा प्रयोग करण्यात आला मात्र ते चामडे वापरून तयार केलेल्या घुमटाचा नाद घोरपडीचे चामडे वापरुन तयार केलेल्या घुमटाशी बरोबरी करू शकत नसल्याचे राज्यातील काही लोककलाकारांचे मत आहे.

घुमट, घोरपडीच्या चामडयाचा वापर करून बनवलेले गोव्याचे पारंपारिक चर्मवाद्य

घोरपडीच्या चामड्याला पर्याय म्हणून सिंथेटिक चामडे, बकरीचे चामडे वापरण्याचा प्रयोग करण्यात आला. मात्र घोरपडीच्या चामड्यातून येणारा नाद व परिणाम अन्य चामड्याचा वापर करून मिळवता येत नाही.कारण घुमटाला अन्य चर्म वाद्याप्रमाणे वाद्य चढवणे व उतरविण्याची सोय नसते. घुमट हे मातीचे असल्याने तशी सोय करता येत नाही. त्याला पर्याय म्हणून निसर्गातील घोरपडीची संख्या अबाधित ठेवून त्याचे संवर्धन करण्यासाठी कृत्रीमरित्या त्यांची नर्सरी करण्यासाठी प्रयत्न करण्याची शक्यता पडताळून पाहण्याची गरज पैगीण मधील एक लोककलाकार व लोककला अभ्यासक महेंद्र फळदेसाई यांनी व्यक्त केली.

म्हणूनच परराज्यातील चर्मवाद्य विक्रेत्याचे फावले...

घोरपडीच्या घुमटावर बंदी असल्याने आज बाजारात पारंपारिक घुमट विक्रीसाठी ठेवलेले अभावानेच दिसते. मात्र नाक्यानाक्यावर बाजारात परराज्यातील विक्रेते ढोलकी घेऊन विक्री (Dholak Seller) करताना दिसत आहे. ढोलकीसाठी बकरीच्या चामड्याचा उपयोग करण्यात येत असल्याचे ते सांगतात. त्याशिवाय सिंथेटिक चामड्यापासून तयार केलेले लहान आकारातील ताशे विकले जात आहे. ढोलक्याची किंमत चारशे ते सहाशे रूपये तर ताशांची किंमत दोनशे रूपये आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT