Goa: Ganpati Bappa Dainik Gomantak
गोवा

Goa: ‘कोरोनारुपी’ राक्षसाला ठेचणाऱ्या गणेशमूर्तींना भाविकांकडून मागणी

Goa: देखाव्‍यांचीही क्रेझ; यंदाही गणेशोत्‍सवावर कोरोनाचे सावट

Santosh Kubal

पणजी : गोमंतकीयांसाठी जिव्हाळ्याचा उत्सव असलेल्या गणेशोत्सवावर यंदाही कोरोनाचे सावट आहे. त्याचे प्रतिबिंब श्रींच्या मूर्तीमध्ये पाहावयास मिळत आहे. राज्यातील अनेक मूर्तिकारांनी श्री गणराय कोरोनाला ठेचत असल्याच्या मूर्ती बनविल्या असून, त्या बाजारात भाव खाऊन जात आहेत. कोरोनामुळे सरकारकडून गतवर्षीप्रमाणे यंदाही गणेश चतुर्थी उत्‍सवावर निर्बंध लादले जाणार आहेत.

गर्दीवर नियंत्रण आणण्यास सरकार अपयशी ठरले आहे. त्‍यातच चतुर्थीचा उत्‍सव जवळ आल्‍याने चिंता आणखी वाढली आहे. कारण या सणासाठी बाजारात तुडुंब गर्दी उसळणार हे सांगायला कोणा ज्‍योतिषाची गरज नाही. परिणामी कोरोनाचा संसर्ग आणखी वाढेल अशी भीती सरकारला वाटत आहे. दुसरीकडे कलाकार कोरोनावरील राग मूर्तीद्वारे व्‍यक्त करत आहेत. संपूर्ण जगाला वेठीस धरणाऱ्या आणि सर्वसामान्‍यांचे जीवन हैराण करणाऱ्या या कोरोनारुपी राक्षसाचा वध करणाऱ्या गणेशमूर्ती तयार करण्‍यात आल्‍या आहेत. विशेष म्‍हणजे भाविकांकडून या मूर्तींना जोरदार प्रतिसाद मिळत आहे.

पर्यावरणाचा ऱ्हास, शेतीचे नुकसान, स्थानिक सण-उत्सवांची महती सांगणारे देखावे गणेशमूर्तीतून प्रतिबिंबीत करण्याची क्रेझ सध्‍या उफाळली आहे. त्यात आता कोरोना राक्षसाची भर पडली आहे. यंदाही महामारी कायम आहे. शिवाय तिसऱ्या लाटेची शक्यताही वर्तविली जात आहे. या पार्श्‍वभूमीवर बहुतांश मूर्तिकारांनी मूर्ती बनविल्या आहेत. विशेषतः या मूर्ती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांकडून खरेदी केल्या जात आहेत.

कोरोना जागृतीवर प्रकाशझोत

गतवर्षी राज्यात अनेक ठिकाणी कोरोना जागृतीबाबतचे देखावे सादर केले होते. घरोघरीही जागृती केली जात होती. यंदा कोरोनाची तिसरी लाट येण्‍याची शक्‍यता गृहित धरून देखावे बनविण्यासाठी मंडळांची तयारी सुरू आहे.

दरवर्षी काही तरी विशेष घटना घडते. त्या आधारावर गणेशमूर्ती बनविल्या जातात. अशा मूर्तींना प्रचंड मागणी असते. दोन वर्षांपासून राज्यावर कोरोनाचे संकट आहे. त्यामुळे या विषयाशी संबंधित मूर्ती बनविल्या जात आहेत.

- सिद्धेश देसाई, गणेशमूर्ती व्‍यावसायिक (पणजी)

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

जगाचा नकाशा अचूकतेने मांडण्याच्या UN च्या प्रस्तावाला भारताचा पाठिंबा, पण J&K आणि लडाखच्या सीमांबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिला स्पष्ट इशारा

Keri Ambulance Service: केरीला मिळाली 3 दिवसांत 108 रुग्णवाहिका; विधानसभेत आरोलकरांनी प्रश्न उपस्थित करताच सरकारची कार्यवाही

Accident Death: दारूची नशा बेतली जीवावर; दुचाकीवरील ताबा सुटला, नाल्यात पडून 30 वर्षीय युवकाचा मृत्यू

Bank Job: SBI मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! 12,000 जागांसाठी होणार मेगाभरती, 250 नव्या शाखा सुरू करण्याचा बँकेचा प्लॅन

Congress Dalit Tribal Support: दलित-आदिवासींची साथ मिळवणे काँग्रेससाठी सोपे नाही! राहुल गांधींसमोर मोठे राजकीय आव्हान

SCROLL FOR NEXT