IFFI 53 | Goa Dainik Gomantak
गोवा

गोव्यात IFFI 53 ग्रॅंड तयारी; CM प्रमोद सावंतांकडून पाहणी

IFFI in Goa: आजपासून गोव्यात भारतीय चित्रपट महोत्सवाला सुरुवात होणार आहे.

दैनिक गोमन्तक

भारताचा सर्वात मोठा चित्रपट महोत्सव (IFFI) आजपासून सुरु होणार आहे. गोव्यात (Goa) 20 ते 28 नोव्हेंबर दरम्यान हा महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत असतो. या चित्रपट महोत्सवात भारतातील विविध चित्रपटांची झलक पाहायला मिळणार आहे. गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत (CM Pramod Sawant) यांनी रविवारी सकाळी आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या उद्धाटन कार्यक्रमाची तयारीची पाहणी केली आहे.

गोवा (Goa) आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी सज्ज झाला आहे. इफ्फीच्या उद्धाटन कार्यक्रमाची तयारी देखील पूर्ण झाली आहे. डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी सभागृहात इफ्फीचा उद्धाटन कार्यक्रम होणार आहे. महोत्सवात जगभरातील 79 देशातील 280 हून अधिक चित्रपट दाखवले जाणार आहेत. इफ्फीदरम्यान 118 आंतरराष्ट्रीय आणि 221 भारतीय चित्रपट कलाकार देखील उपस्थित राहणार आहेत. 

दरम्यान, माहिती आणि प्रसारण मंत्रालय आणि गोवा सरकार (Goa Government) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या चित्रपट महोत्सवाबद्दल (Film Festival) पंतप्रधान मोदींनी एक पोस्ट शेअर केली. यामध्ये लिहिले की, 'इफ्फी हा भारताचा सर्वात मोठा चित्रपट महोत्सव आहे. इफ्फी (IFFI) आणि भारतीय चित्रपटांनी जागतिक मंचावर स्वत:साठी एक स्थान निर्माण केले आहे. चित्रपट महोत्सवाशी निगडीत सर्वांना हार्दिक शुभेच्छा. 53 वा इफ्फी चित्रपट मोहोत्सव यशस्वी होवो.'

गोव्यात (Goa) होणाऱ्या इफ्फीमध्ये (IFFI) चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकार हजेरी लावणार आहेत. मराठीसह हिंदी आणि दाक्षिणात्य चित्रपटांचे खास स्क्रिनिंग होणार आहे. 'थ्री ऑफ अस', 'द स्टोरी टेलर', 'मेजर', 'सिया', 'द कश्मीर फाइल्स' हे हिंदी चित्रपट दाखवले जाणार आहेत. तसेच एस.एस राजामौलींचा 'आरआरआर' (RRR) हे तेलुगू वर्जनमधील चित्रपट प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.  

आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात पाच मराठी चित्रपटांची (Marathi Movie) गनिवड करण्यात आली आहे. यात विक्रम पटवर्धन यांचा 'फ्रेम', दिग्पाल लांजेरकचा 'शेर शिवराज', डॉ. सलील कुलकर्णी यांचा 'एकदा काय झालं', प्रवीण तरडे यांचा 'धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे' आणि शेखर रणखांबे यांच्या 'रेखा' या चित्रपटांचा समावेश आहे. 

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Canacona: पर्यटन व्यवसायातील कामगारांचे हित जपणार, काणकोणात मंत्री तवडकरांची ग्वाही

Valpoi Road Issue: होंडा येथील रस्त्यांची दुरवस्था, गावकरवाडा ते पोलिस स्टेशनपर्यंत दैना; नवरात्रीपूर्वी डागडुजी करण्याची स्थानिकांची मागणी

Goa Live News: व्लॉगर अक्षय वशिष्ठला जामीन मंजूर!

Goa Crime: फार्म हाउसमधील रोख, दुचाकी घेऊन काढला होता पळ, 6 महिन्यांपासून फरार असलेल्या आरोपीला अटक

Shirgaon Stampede: 'शिरगाव' दोषींवर कारवाई होणार? गृह खात्याकडून फाईल सरकारकडे, काय आहे चौकशी समितीचे म्हणणे?

SCROLL FOR NEXT