B. K. Mishra Panjim
गोवा

Goa: संशोधक, वैज्ञानिकांनी भारताला नेले कीर्तीच्या शिखरावर

Goa: आयआयटी गोवाचे संचालक डॉ. बी. के. मिश्रा यांचे प्रतिपादन

Santosh Kubal

पणजी (प्रतिनिधी) : स्वातंत्र्यपूर्व काळात भारतीय वैज्ञानिकांनी केलेल्या कार्याने भारत नेहमीच विज्ञान क्षेत्रात अग्रेसर राहिला आहे. त्यांचाच वसा पुढील पिढीतील वैज्ञानिक व संशोधकांनी जोपासत भारताचे नाव प्रत्येक क्षेत्रात चमकत ठेवल्याचे प्रतिपादन आयआयटी गोवाचे संचालक डॉ. बी. के. मिश्रा यांनी येथे केले. विज्ञान भारतीची गोवा शाखा असलेल्या विज्ञान परिषदेतर्फे गोवा विज्ञान केंद्राच्या सहकार्याने भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या अमृतमहोत्सवी सोहळ्यानिमित्त विशेष कार्यक्रम मिरामार येथील विज्ञान केंद्रात साजरा करण्यात आला. यावेळी ‘स्वातंत्र्य लढ्यातील वैज्ञानिकांचे व विज्ञान संस्थांचे योगदान’ या विषयावर प्रमुख पाहुणे या नात्याने मिश्रा बोलत होते. गोवा विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. सतीश शेट्ये हे सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी होते. विज्ञान केंद्राचे प्रकल्प समन्वयक व्‍यंकटदुर्गा प्रसाद, विज्ञान परिषद गोवाचे अध्यक्ष सुहास गोडसे व उपाध्यक्ष आय. के. पै हेही यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते. कोविड मार्गदर्शन नियमांचे पालन करून वेगवेगळ्या क्षेत्रांतील मान्यवरांचीही या सोहळ्याला विशेष हजेरी लाभली होती.

प्राचीन काळापासून स्वातंत्र्यपूर्व व स्वातंत्र्योत्तर काळात वैज्ञानिकांच्या योगदानाची मिश्रा यांनी सखोल माहिती दिली. ६व्या शतकातील सुश्रृत संहितेचा त्यांनी उल्लेख केला. जे. सी बोस, नोबेल पुरस्कारप्राप्त सी. व्ही. रमण, रामानुजम, सी. आर. राव, एस. झेड. कासीम व रोधाम नरसिंह या वैज्ञानिकांच्या नामोल्लेख करत संशोधन व तंत्रज्ञानात नेहमीच भारतीय अग्रेसर असल्याचे त्यांनी सिद्ध केल्याचे मिश्रा म्हणाले.

प्रारंभी गोडसे यांनी उपस्थितांचे स्वागत केले. विज्ञान भारतीच्या ज्याला पूर्वी स्वदेशी विज्ञान चळवळ म्हणून ओळखले जायचे, त्यांच्यातर्फे वर्षभर राबविल्या जाणाया कार्यक्रमांची माहिती यावेळी देण्यात आली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

खरी कुजबुज: बाबू पुन्हा आक्रमक...

8th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार थेट 69,000 रूपये होणार? 8व्या वेतन आयोगासमोर 3.833 फिटमेंट फॅक्टरची मागणी

CJP Protest Delhi: आंदोलकांवरील निर्बंधांवर सर्वोच्च न्यायालयाची पोलिसांना चपराक! रस्ते, मेट्रो आणि इंटरनेट सेवा पूर्ववत करण्याचे आदेश; प्रशासनाचे दणाणले धाबे

Stray Dogs Beach: समुद्रकिनाऱ्यांवरील भटक्या कुत्र्यांची दहशत मोडून काढणार! पर्यटन खात्याचा 15 ऑक्टोबरचा अल्टीमेटम!

VIDEO: चौकाराच्या गैरसमजात तिलक वर्माने गमावली विकेट! पिचवरच थांबला अन् झाला रनआऊट, विंडीजच्या खेळाडूंना हसू आवरेना; गंभीर भडकला

SCROLL FOR NEXT