Goa: Speaking after inaugurating the 'Know Your Schemes' service, Chief Minister Dr. Pramod Sawant. On the side, Principal Finance Secretary Puneet Goel and IT Director Ankita Anand. Dainik Gomantak
गोवा

Goa: २४ खात्याच्या १५४ सेवा जनतेच्या दारी!

Goa: ‘नो युवर स्कीम्स’ सेवेचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्‍घाटन

Yeshwant Patil

पणजी : राज्यातील (Goa State) लोकांना खात्याच्या विविध योजनांबाबत (Diffrent Scheems) जनजागृती, ते कोणत्या योजनेसाठी पात्र आहेत व त्या त्यांना ऑनलाईन पद्धतीने उपलब्ध व्हाव्यात यासाठी आज सरकारने ‘नो युवर स्कीम्स’ (Know your Scheems) (तुमच्या योजना जाणा) सेवा (Service) सुरू केली असून त्याचे उद्‍घाटन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत (Cheif Minister Dr. Pramod Sawant) यांच्या हस्ते. या सेवेची माहिती ऑनलाईन उपलब्ध करण्याबरोबरच पंचायती व पालिकांमध्य ती केली आहे. २४ खात्यांच्या सुमारे १५४ विविध सेवा ऑनलाईनवर उपलब्ध करण्यात आल्या आहेत.

सेवेच्या उद्‍घाटनानंतर यासंदर्भात अधिक माहिती देताना मुख्यमंत्री डॉ. सावंत म्हणाले की, माहिती तंत्रज्ञान तसेच नियोजन, सांख्यिकी व मूल्यांकन खात्यातर्फे तयार करण्यात आलेल्या संकल्पनेमुळे लोकांना त्याचा अधिक फायदा होणार आहे. अंत्योदय तत्त्वावर सरकार चालते हे यातून दिसून येत आहे. यापूर्वी लोकांना खात्याच्या विविध योजनांच्या माहितीसाठी खात्याच्या कार्यालयात जावे लागत होते. मात्र, ‘नो युवर स्कीम’ या सेवेमुळे काहींना ऑनलाईनद्वारे घरबसल्या या योजनांची माहिती मिळू शकते. ज्यांना शक्य नाही त्यांना पंचायत किंवा पालिकेमध्ये जाऊन त्याची माहिती मिळवता येते. यामध्ये तुमच्या निकषानुसार तुम्ही कोणत्या योजनेसाठी पात्र आहात याचीही माहिती सरकारच्या ऑनलाईन पोर्टलवर उपलब्ध होणार आहे. यापुढे लोकांना संबंधित खात्यात किंवा तालुकावार कार्यालयात जाण्याची
गरज भासणार नाही. काही योजनांसाठी ऑनलाईनवरून अर्ज करणे शक्य नाही त्यासाठी पंचायत व पालिकांमध्ये तेथील कर्मचाऱ्यांना संबंधित अर्जाची छापील प्रत लोकांना उपलब्ध करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. हे अर्ज भरून पंचायत व पालिकांमध्येच देण्याची सोय ठेवण्यात आली आहे. यंदाचे गोवा मुक्तीदिनाचे ६० वे वर्ष असल्याने त्यानिमित्त राज्यातील प्रत्येक व्यक्ती योजनांपासून वंचित राहू नये हे सरकारचे ध्येय असल्याचे सावंत म्हणाले. या कार्यक्रमाला वित्त प्रधान सचिव पुनीत गोएल, माहिती तंत्रज्ञान संचालक अंकिता आनंद, जीईएलच्या सीईओ व कार्यकारी संचालक रेवती कुमार, नियोजन, सांख्यिकी व मूल्यांकन खात्याचे संचालक वाय. दुर्गाप्रसाद तसेच आयटी व जीईलचे अधिकारी उपस्थित होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

"मतचोरी करून पुन्हा सत्तेत येण्याचा प्रयत्न" प्रियांका गांधी-वद्रा यांची 'NDA'वर टीका; 65 लाख नावे वगळल्याचा आरोप

Department of Animal Husbandry: पशुसंवर्धन खाते प्रमुखांविना ठप्प, कामधेनू सुधारित योजनेसह अनेक योजना प्रभावित

Goa Today's News Live: बांबोळीत पुन्हा अपघात, दुभाजकाला धडकली बस

Horoscope: आजचा दिवस 'गोल्डन'! गुरुवारी 'या' 3 राशींच्या नशिबाचे दरवाजे उघडणार, परिश्रमाचे उत्तम फळ मिळणार

Night Vigil App: तंत्रज्ञानामुळे रात्रीची सुरक्षा होणार अधिक सक्षम, विद्यार्थ्यांनी बनवलेले 'नाईट व्हिजिल' ॲप पोलिसांसाठी नवे हत्‍यार

SCROLL FOR NEXT