37th National Games Goa  Dainik Gomantak
गोवा

37th National Games: सुवर्णपदक विजेत्या संघाला क्रीडामंत्र्यांची 'दिवाळी भेट'; जाहिर केली तब्बल 'एवढी' रक्कम

37th National Games: क्रीडा प्राधिकरणाची नियमावली: वैयक्तिक पदकाच्या तीनपट बक्षीस रक्कम

किशोर पेटकर

37th National Games: गोवा क्रीडा प्राधिकरणाच्या नियमावलीनुसार 37 व्या राष्‍ट्रीय क्रीडा स्पर्धेत गोव्यासाठी सुवर्ण, रौप्य व ब्राँझपदक विजेत्या खेळाडूस क्रीडामंत्री गोविंद गावडे यांनी अनुक्रमे प्रत्येकी तीन लाख रुपये, दोन लाख रुपये व एक लाख रुपये देण्याचे जाहीर केले आहे. मात्र सांघिक पदक विजेत्यांना वैयक्तिक पदकाच्या तीनपट बक्षीस रक्कम देण्याचा नियम आहे.

गोवा क्रीडा प्राधिकरणाच्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा बक्षीस रक्कम नियमानुसार वैयक्तिक पदकाच्या तीनपट बक्षीस रकमेच्या हिशोबाने सांघिक गटात सुवर्णपदकासाठी नऊ लाख रुपये, रौप्यपदकासाठी सहा लाख रुपये, तर ब्राँझपदकासाठी तीन लाख रुपये द्यावे लागतील. ही रक्कम संघांतील प्रत्येक सदस्याला समप्रमाणात वितरीत करायची असते.

यजमान या नात्याने 37 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत गोव्याने पदकांचा उच्चांक नोंदविताना 27 सुवर्ण, 27 रौप्य व 38 ब्राँझपदक मिळून एकूण 92 पदके जिंकली.

सांघिक गटात गोव्याला एकूण 16 पदके मिळाली. यामध्ये आठ सुवर्ण, तीन रौप्य व पाच ब्राँझपदकांचा समावेश आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT