37th National Games Dainik Gomantak
गोवा

37th National Games: श्रीहरी नटराज, धिनिधीने गाजविली जलतरण स्पर्धा

किशोर पेटकर

37th National Games: कर्नाटकच्या श्रीहरी नटराज आणि चौदा वर्षीय धिनिधी देसिंघू यांनी गोव्यातील ३७व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत जलतरणात दबदबा राखला. स्पर्धेच्या इतिहासात सात सुवर्णपदक जिंकणारी धिनिधी सर्वांत युवा जलतरणपटू ठरली.

कांपाल येथील जलतरण तलावात जलतरण स्पर्धा शनिवारी संपली. श्रीहरी याने पुरुष गटात वर्चस्व राखताना आठ सुवर्ण, एक रौप्य व एक ब्राँझ अशी एकूण 10 पदके जिंकली. कर्नाटकने स्पर्धेत 19 सुवर्ण, 8 रौप्य व 12 ब्राँझ अशी एकूण 39 पदके जिंकून अग्रस्थान मिळविले.

स्पर्धेच्या अखेरच्या दिवशी शनिवारी श्रीहरी याने पुरुषांच्या 100 मीटर फ्रीस्टाईल शर्यतीत 49.97 सेकंद या स्पर्धा विक्रम वेळेसह सुवर्णपदक जिंकले. त्याने गतवर्षी नोंदविलेला आपलाच 50.41 सेकंद वेळेचे विक्रम मोडला.

महिलांच्या 100 मीटर फ्रीस्टाईल शर्यतीत धिनिदी हिने स्पर्धा विक्रम नोंदविला. तिने 57.87 सेकंद वेळेसह सुवर्णपदक जिंकताना 2015 साली शिवानी कटारिया (५८.३४ सेकंद) हिने नोंदविलेला विक्रम मोडीत काढला.

श्रीहरी नटराज, विदित शंकर, निना व्यंकटेश आणि धिनिधी देसिंघू यांचा समावेश असलेल्या कर्नाटकच्या मिश्र रिले संघाने ४ बाय १०० मीटर मेडलीत स्पर्धा विक्रमासह सुवर्णपदक प्राप्त केले. कर्नाटकच्या संघाने ४ मिनिटे ०३.८० सेकंद वेळ नोंदविली.

दिवसभरातील आणखी एक स्पर्धा विक्रम केरळच्या हर्षिता जयराम हिने १०० मीटर ब्रेस्टस्ट्रोक शर्यतीत नोंदविला. तिने १ मिनिट १३.८९ सेकंद वेळेसह सुवर्णपदक प्राप्त केले. गतवर्षी चाहत अरोरा हिने नोंदविलेला १ मिनिट १४.४२ सेकंद वेळेचा विक्रम हर्षिता मोडला.

कॅनोईंगमध्ये अर्जुनला सुवर्णपदक

शापोरा नदीत सुरू असलेल्या कॅनोईंग-कयाकिंग स्पर्धेत मध्य प्रदेशच्या अर्जुन सिंग याने 1000 मीटर गटात वैयक्तिक सुवर्णपदक जिंकले, तर नंतर सहकारी सोनू वर्मा याच्यासमवेत 100 मीटक कॅनोय प्रकारात रौप्यपदक जिंकले. हांग् चौऊ आशियाई क्रीडा स्पर्धेत अर्जुनने भाग घेतला होता.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Crime News: गोव्यातील धक्कादायक प्रकार! एका भावाकडून दुसऱ्या भावाच्या होणाऱ्या बायकोचा लैंगिक छळ

Mhadei Water Dispute: ‘म्‍हादई’च्‍या मुद्यावरून काँग्रेस व भाजपमध्‍ये 'तू तू - मैं मैं'

Rarest Birds in World: जगातील 'हे' दुर्मिळ पक्षी नामशेष होण्याच्या वाटेवर; जाणून घ्या

२१ कुटुंबे नव्या घरात करणार गणरायाचे स्वागत! राणे दाम्पत्यामुळे गणेशोत्सव ठरणार खास

भारतीयांना दिवसाला प्राप्त होतात 12 फसवे मेसेज; आतापर्यंत 93,000 हून अधिक टेलिकॉम स्कॅम!

SCROLL FOR NEXT