IFFI Goa 2024 Opening Ceremony Dainik Gomantak
गोवा

दिग्गज कलाकारांच्या उपस्थितीत, धमाकेदार सादरीकरणाने झाले इफ्फीचे ग्रँड उद्घाटन; गोव्यातील ठळक बातम्या

Goa Latest News: ५५ व्या इफ्फीचे दणक्यात पार पडले उद्घाटन, सहकार क्षेत्रात वेगळ्या प्रकारचा फ्रॉड सुरु असल्याचा मुख्यमंत्री सावंत यांचा खुलासा.

Akshata Chhatre

आम्हाला मांद्रेचे 'कळंगुट' झालेले नको...

मांद्रे मतदारसंघातील सर्व आमदार जीत आरोलकर समर्थक सरपंचांनी पत्रकार परिषदेत घेतला मायकल लोबोंचा समाचार. मांद्रेतील काळे धंदे बंद करण्याचाही दिला मायकलना सल्ला.

मायकल लोबोंनी मांद्रेची काळजी करू नये; मांद्रेतील सरपंचांचे एकमत

आमदार आरोलकर मांद्रे मतदार संघाचा विकास करण्यास कटीबध्द असून मुख्यमंत्र्यांनीही विकासासंदर्भात सहकार्य करायचे आश्वासन दिले आहे. त्यामुळे मायकल लोबोंनी मांद्रेची काळजी करू नये. मांद्रेतील सरपंचांचे एकमत.

Inaugural Ceremony of 55th International Film Festival of India, Goa

IFFI च्या उद्घाटन समारंभाला सुरुवात, बॉलीवूडचे दिग्गज कलाकारांची हजेरी

IFFI Goa 2024 Opening Ceremony Watch Live

कोट्यवधी रुपयांचे नुकसान, सहकार क्षेत्रात वेगळ्या प्रकारचा फ्रॉड; मुख्यमंत्री सावंत

सहकार क्षेत्रात काही जणांच्या लुबाडणुकीच्या घटना समोर आल्यात, यात अनेकांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. हा वेगळ्या प्रकारचा फ्रॉड आहे, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणाले.

Goa Politics: मायकल लोबोंना आम्ही रोखू शकत नाही; मांद्रेतून लढण्याबाबत कळंगुट सरपंच सिक्वेरांचे वक्तव्य

आगामी विधानसभा निवडणूक मांद्रेतून लढण्याबाबत सूचक वक्तव्य कळंगुटचे आमदार मायकल लोबो यांनी केले होते. यावर आता कळंगुटचे सरपंच जोसेफ सिक्वेरा यांनी प्रतिक्रिया देताना त्यांची इच्छा असेल तर आम्ही त्यांना रोखू शकत नाही, अशी प्रतिक्रिया दिली आहे.

मांद्रेसाठी इच्छुकांची मांदीयाळी; आता माजी सरपंच प्रशांत नाईकही शर्यतीत

आगामी गोवा विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुकांची मांदीयाळी पाहायला मिळत आहे. मायकल लोबो यांनी मांद्रेतून लढण्याची इच्छा व्यक्त केल्यानंतर आता मांद्रेचे माजी सरपंच प्रशांत नाईक यांनीही मांद्रेतून लढण्याचा मानस व्यक्त केला आहे.

Goa Police: एक्सपोझिशनसाठी 1,000; इफ्फीसाठी 300 पोलिस तैनात

संत फ्रान्सिस झेवियर यांच्या एक्सपोझिशनसाठी एक हजार तर इफ्फी २०२४ साठी ३०० पोलीस तैनात करण्यात आले आहेत. नागरिकांसाठी एक्सपोझिशनच्या ठिकाणी कॅमेरा, धारदार वस्तू, तसेच ज्वलनशील वस्तू घेऊन जाण्यावर बंदी असेल.

नागरिकांनी कसल्याच प्रकारची मौल्यवान वस्तू परिधान करून एक्सपोझिशन च्या ठिकाणी येऊ नये, असे आवाहन पोलिस अधीक्षक अक्षत कौशल यांनी केले आहे.

कॅश फॉर प्लॉटमध्ये अंध युवतीची 8 लाख रुपयांची फसवणूक

पर्वरी हाऊसिंगबोर्डमध्ये प्लॉट देण्याचे आमिष दाखवून मडगावातील मुनीरूद्दीन खान व त्यांच्या अंध मुलीला भाटले पणजीतील सादिक शेख याने 8 लाखांचा गंडा घातला. यानंतर तक्रारदाराने मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची भेट घेतली आणि त्यांना न्याय मिळवून देण्याचे मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिले आहे.

कुळे पोलिसांकडून 16 हजार रुपयांची दारू जप्त

कुळे पोलिसांनी मोले मार्गावर तब्बल 16 हजार रुपये किमतीच्या 64 दारूच्या बाटल्या असलेली एक पेटी जप्त केली असून एकूण प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

Goa Live Updates Today: Lights, Camera, ACTION!! 55व्या इफ्फीसाठी गोवा सज्ज

आज बुधवारी (दि. 20 नोव्हेंबर) पासून गोव्यात डॉ. शामाप्रसाद मुखर्जी मैदानावर आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची सुरुवात होणार आहे.

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक; मतदानाला सुरुवात

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील 288 जागांसाठी मतदानाला आज (दि. 20 नोव्हेंबर) रोजी सुरुवात झाली आहे आणि संध्याकाळी 6 वाजता हे मतदान संपेल. यानंतर 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pakistani Team: 'पाकिस्तान' टीम खेळणार भारतात! क्रीडा मंत्रालयाकडून ग्रीन सिग्नल; 2 करंडकांमध्ये घेणार भाग

Goa Rain: गोव्यात जिकडे तिकडे पाणीच पाणी! पावसाचा रौद्रावतार; आपत्कालीन यंत्रणा सतर्क

Rahul Keni: गोव्याचे राहुल केणी बनले BCCIचे सामनाधिकारी! पंच परीक्षेत मिळवला सहावा क्रमांक

Goa Crime: रिचार्ज पॅक साठी फोन केला, 44 हजार रुपये केले लंपास; गोकुळवाडी-साखळीतील महिलेला गंडा

Comunidade: 30 कोमुनिदादींची निवडणूक घ्या! सदस्यांची मागणी; गणपूर्तीअभावी रखडल्या प्रक्रिया

SCROLL FOR NEXT