Entrance Exam Dainik Gomantak
गोवा

LLB Admission Process मध्ये नक्की चाल्लयं काय? 60 टक्केवाले मेरीट यादीत तर 90 टक्के मिळूनही...

सरकारने चौकशी करण्याची मागणी

गोमन्तक डिजिटल टीम

LLB Entrance Exam बारावीचे गुण लक्षात न घेता फक्त प्रवेश परीक्षेत मिळालेले गुण लक्षात घेऊन यावेळी एलएलबी (पाच वर्षांचा कोर्स) अभ्यासक्रमात प्रवेश दिला गेल्याने बारावीत जेमतेम साठ टक्के गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांचे नाव मेरीट यादीत दिमाखात झळकले.

तर बारावीत ९० टक्के व त्याहून अधिक गुण मिळविलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेशापासून वंचित राहावे लागले. हुशार विद्यार्थ्यांवर झालेला हा मोठा अन्याय असल्याची प्रतिक्रिया आता व्यक्त होऊ लागली आहे.

सोहम सुहास हळवे या विद्यार्थ्याला बारावीत ९४.३३ टक्के गुण मिळाले होते; पण प्रवेश परीक्षेत त्याला ४९ गुण मिळाल्याने त्याचे नाव प्रतीक्षा यादीत ढकलले गेले.

मारिया रॉड्रिग्स या विद्यार्थिनीला बारावीत ९३.१७ टक्के, अनिझा डिकुन्हा या विद्यार्थिनीला ९२.३३ टक्के, मनस्वी मोरजकर हिला ९१.२० टक्के, तर सेजल गडेकर हिला बारावीत ९० टक्के गुण प्राप्त झाले.

मात्र, प्रवेश परीक्षेत त्यांना कमी गुण मिळाल्याने या सर्वांना या अभ्यासक्रमासाठी प्रवेश मिळाला नाही. शिवाय आणखी ११ विद्यार्थी असे आहेत, ज्यांना बारावीत ८५ टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळाले, त्यांनाही प्रवेश परीक्षेत कमी गुण मिळाल्याने या अभ्यासक्रमास प्रवेश मिळाला नाही.

या अभ्यासक्रमासाठी पात्रता मिळविण्यासाठी ज्या विद्यार्थ्यांनी ही प्रवेश परीक्षा दिली, त्यातील कित्येक विद्यार्थ्यांशी संपर्क साधला असता आमचे बारावीचे गुण प्रवेश देताना गृहीत धरले नाहीत, हे आम्हाला निकाल आल्यावरच समजले. यंदा हा बदल केला आहे, याची आम्हाला कुणीही माहिती दिली नव्हती, असे त्यांनी सांगितले.

...ही पथ्ये का पाळली नाहीत?

1. ज्यावेळी कुणाचा आप्त लाभार्थी असेल तर त्या प्रक्रियेपासून त्या संबंधित अधिकाऱ्याने स्वतःला बाजूला ठेवणे, ही सर्वमान्य प्रथा आहे.

2. जर कारे कायदा महाविद्यालयाच्या प्राचार्यांचा मुलगा ही परीक्षा देणार होता, तर ही परीक्षा घेण्यास या महाविद्यालयाने नकार देत यंदा ही परीक्षा साळगावकर महाविद्यालयाने घ्यावी, असा प्रस्ताव सरकारला का दिला नाही?

3. आपला मुलगा परीक्षा देत असताना प्राचार्य साबा दा सिल्वा स्वतः परीक्षा प्रक्रियेपासून दूर का झाले नाहीत?

4. मुलगा लाभार्थी असताना प्रवेशाची सर्व प्रक्रिया त्यांच्याच सहीने का केली?

...याची उत्तरे विद्यापीठाने द्यावीत!

  • 2017 साली जारी केलेले परिपत्रक 2023 साली आणि तेही शेवटच्या क्षणी लागू का केले?

  • या प्रवेश परीक्षेचे पेपर कुणी तयार केले? ते कुठे छापले? ते कुणी तपासले?

  • ही सर्व प्रक्रिया पारदर्शकरित्या केली का?

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Barge Sank: समुद्रात असलेल्या जहाजाच्या अवशेषांनी घात केला; मुरगावात लोखंडी प्लेट्सने भरलेल्या बार्जला जलसमाधी, 8 खलाशी बचावले

...अन्यथा मनोहर पर्रीकरांना खोटारडे ठरवा; मंत्री माविन यांच्याविरोधात गोवा सरकार उच्च न्यायालयात जाणार का? चोडणकरांचा सवाल

Liquor Seized: गोवा बनावटीचे 35 लिटर मद्य जप्त! अनमोड चेकपोस्टवर कारवाई; कर्नाटकच्या चालकाला अटक

Viral Video: सापालाही आवडला नाही भोजपुरी गाण्यातला तो 'सीन', मोबाईलच्या स्क्रीनवर असं काय केलं की व्हिडिओ झटक्यात व्हायरल!

Viral Video: कोर्टात केस जिंकल्यावर भटक्या कुत्र्यांची गोव्यात पिकनिक; सोशल मिडियावर धुमाकूळ घालतोय व्हिडिओ Watch

SCROLL FOR NEXT