Goa 108 Ambulance Service Dainik Gomantak
गोवा

गोवा आरोग्‍य खात्याचा रुग्णांच्या जीवाशी खेळ; फिटनेस सर्टिफिकेट नसताना तीन वर्षे चालली रुग्‍णवाहिका

Margao Hospital: हॉस्‍पिसियोकडे रुग्‍णवाहिका चालविणारे सात चालक आहेत त्‍यातील तीन हे मल्‍टीटास्‍क सेवा कर्मचारी म्‍हणून घेतले होते

गोमन्तक डिजिटल टीम

South Goa District Hospital Patient Death Case

मडगाव: शिरीष काणे यांच्‍या मृत्‍युमुळे हॉस्‍पिसियो इस्‍पितळातील समस्‍यांना वाचा फुटते आहे. खासकरून रुग्‍णवाहिका सेवा. तेथे कुठल्‍याही इमर्जन्‍सीच्‍यावेळी १०८ च्‍या रुग्‍णवाहिकेला बोलावून घेतले जाते. मात्र, या रुग्‍णवाहिकांना त्‍यांचे दळणवळणाचे क्षेत्र आखून दिलेले असल्‍यामुळे त्‍यांना आपले क्षेत्र सोडून दुसरीकडे जाता येत नाही. त्‍यामुळे मडगावची रुग्‍णवाहिका दुसऱ्या कामासाठी गेली असल्‍यास तातडीच्‍यावेळी ती उपलब्‍ध होऊ शकत नाही.

यासंबंधी बोलताना एका ज्‍येष्‍ठ डॉक्‍टरने आपले नाव न छापण्‍याच्‍या अटीवर सांगितले की, यासाठीच ही १०८ रुग्‍णवाहिका सेवा खासगी कंपनीला चालवायला न देता ही सेवा आरोग्‍य खात्‍याच्‍या अधिकार क्षेत्राखाली आणावी, असा प्रस्‍ताव यापूर्वी देण्‍यात आला होता. मात्र, या खासगी कंपनीकडे केलेला व्‍यवहार काही जणांसाठी फायद्याचा ठरत असल्‍यामुळे हा प्रस्‍ताव फेटाळण्‍यात आला.

एमटीएस कामगारांना दिले चालकाचे काम

सध्‍या हॉस्‍पिसियोकडे रुग्‍णवाहिका चालविणारे सात चालक आहेत. मात्र त्‍यातील तीन चालक हे हॉस्‍पिसियोत मल्‍टीटास्‍क सेवा कर्मचारी म्‍हणून घेतले होते. त्‍यांना आता रुग्‍णवाहिका चालक म्‍हणून वापरले जाते. अन्‍य तीन चालक अन्‍य इस्‍पितळात बदलीच्‍या स्‍वरुपात आणले असून हॉस्‍पिसियोचा स्‍वत:चा असा फक्‍त एकच रुग्‍णवाहिका चालक आहे. ही रिक्‍त झालेली पदे अजुन भरलेली नाहीत.

फिटनेस सर्टिफिकेट नसतानाच तीन वर्षे चालली रुग्‍णवाहिका

कुठलीही रुग्‍णवाहिका रस्‍त्‍यावर आणायची असेल तर ती फिटनेस सर्टिफिकेट असल्‍याशिवाय आणता येत नाही. मात्र सध्‍या ही सर्टिफिकेट नसल्‍याने बंद ठेवलेली ती रुग्‍णवाहिका त्‍यापूर्वी तब्‍बल तीन वर्षे ही सर्टिफिकेट नसताना रस्‍त्‍यावर चालविली जायची. या रुग्‍णवाहिकेचे हॉस्‍पिसियोकडे आरसी बुकही उपलब्‍ध नाही. अशा अवस्‍थेत ही वाहिका रस्‍त्‍यावर चालविली जात होती. एका अर्थाने गोव्‍यातील आरोग्‍य खातेच अशाप्रकारे दुसर्‍यांच्‍या जीवांशी खेळत होते असे म्‍हटल्‍यास वावगे ठरणार नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: हातचलाखीचा मास्टर! मासे चोरण्याचा 'जुगाड' सोशल मीडियावर व्हायरल, नेटकऱ्यांनी घेतली शाळा; म्हणाले, ''गजब का टोपीबाज है''

Mitchell Marsh Drinking Beer: वादग्रस्त बोलणं पडलं महागात! फक्त '6 बिअर' बोलल्यामुळे मिचेल मार्शला संघातून 'डच्चू'! काय आहे नेमकं प्रकरण? Watch Video

Goa Police Constable Fraud: पोलिस कॉन्स्टेबलचा भांडाफोड! आंध्र प्रदेशातील बनावट जन्म प्रमाणपत्राच्या आधारे मिळवली नोकरी; पणजी पोलिसांत फसवणुकीचा गुन्हा

Gold Silver Rate: सोन्या-चांदीच्या दरात मोठा उलटफेर! सोन्याच्या दरात घसरण, तर चांदीचे दर 'जैसे थे'; 10 ग्रॅम सोन्याचा भाव किती?

Horoscope: पैसा आणि नोकरीचे संकट! मंगळाच्या अधोगतीमुळे 'या' राशींची आर्थिक स्थिती ढासळणार! सावध राहा

SCROLL FOR NEXT