Yuri Alemao Dainik Gomantak
गोवा

Yuri Alemao: जीर्ण वास्तुंबाबत ‘गो स्लो’ धोरण !

Yuri Alemao: युरींची सरकारवर टीका : ‘स्ट्रक्चरल ऑडिट’ बाबत कुचराई

दैनिक गोमन्तक

Yuri Alemao: मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारने राज्यातील मोडकळीस आलेल्या ‘वारसा इमारती’ कोसळाव्यात म्हणून जाणूनबुजून ‘गो स्लो’ धोरण अवलंबले आहे. गोव्यातील पोर्तुगीजांच्या खुणा पुसून टाकण्याची भाजप सरकारची ही एक पद्धत असल्याचे दिसते, असा घणाघाती आरोप विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी केला आहे.

सरकारने या इमारतीचे तसेच इतर अनेक वारसा इमारतींचे आजपर्यंत ‘सुरक्षा ऑडिट’ केलेले नाही आणि सदर इमारती ‘वास्तव्यासाठी असुरक्षित’ घोषित केलेल्या नाहीत, असे युरी आलेमाव म्हणाले.

सध्या मडगाव येथील जुन्या आरोग्य केंद्राची झालेली पडझड दुरुस्त करण्याबाबत जी सरकारने अक्षम्य वेळकाढूपणा चालवला आहे, या पार्श्वभूमीवर आलेमाव यांनी हा आरोप केला आहे.

या इमारतीच्या दुरुस्तीसाठीच्या खर्चाचा तपशील २५ ऑगस्ट रोजी सरकारला पाठविला होता. मात्र, अजूनही या खर्चाला सरकारने मंजुरी दिलेली नाही.

आलेमाव म्हणाले, सरकारने गोव्यातील सर्व वारसा इमारतींच्या दुरुस्ती, नूतनीकरणाचा कृती आराखडा तयार करावा. इव्हेंट आयोजनावर निधी वाया घालवण्यापेक्षा सरकारने प्रथम या वारसा इमरतींचे जतन करण्यावर लक्ष केंद्रित करावे.

अधिवेशनात बांधकाम खात्याने मला दिलेल्या माहितीवरून कांपाल आणि रायबंदर येथील जुने गोमेकॉ इस्पितळ, मडगावचे हॉस्पिसिओ, कांपालचे मॅकेनिज पॅलेस, पणजीत समाज कल्याण खात्याची इमारत, मडगावचे नागरी आरोग्य केंद्र, शिक्षण खात्याची दक्षिण जिल्हा कार्यालय अशा वारसा वास्तू ‘ असुरक्षित’ असल्याचे स्पष्ट झाले आहे, असेही ते म्हणाले.

माथानी साल्ढाणा संकूलही धोकादायक !

‘माथानी साल्ढाना प्रशासकीय संकूल’ असे नामकरण केलेल्या दक्षिण गोवा जिल्हाधिकारी कार्यालयाची इमारत देखील ‘धोकादायक व मोडकळीस’ आल्याची माहिती सरकारने उत्तरात दिल्याचे पाहून मला धक्काच बसला.

मडगावचे रवींद्र भवन, कांपाल येथील बालभवनची जोड-इमारत, विविध शासकीय निवासी संकुले, प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि शाळांच्या इमारती देखील धोकादायक आणि मोडकळीस आलेल्या इमारतींच्या यादीत दिसत आहेत, असे युरी आलेमाव यांनी सरकारच्या लक्षात आणून दिले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Congo School Fire: कांगो हादरले! दोन शाळांमध्ये भीषण अग्निकांड, 26 विद्यार्थ्यांचा मृत्यू; थरकाप उडवणारा VIDEO समोर

खरी कुजबुज: काँग्रेस-भाजपमधील शीतयुद्ध

Viral: 8 कोटींचे दागिने घालून नववधू मंडपात; पण व्हिडिओ व्हायरल होताच पोलिसांची एन्ट्री अन् वराला ठोकल्या बेड्या! नेमकी भानगड काय? Watch Video

Goa Crime: पर्वरी गोळीबाराचा कट उघडकीस येणार? यूपी-मुंबईतील तिघांना अटक; पोलिसांसमोर मुख्य सूत्रधाराचा शोध घेण्याचं मोठं आव्हान

Bank Holiday: संप, शनिवार-रविवारची सुट्टी अन्‌ गणेश चतुर्थी! शुक्रवारपासून बँका सलग 5 दिवस बंद; ग्राहकांची होणार गैरसोय

SCROLL FOR NEXT