Mukesh Udeshi Passes Away 
गोवा

Mukesh Udeshi Passes Away: 'गो गोवा गॉन' चित्रपटाचे निर्माते मुकेश उदेशी यांचे चेन्नईत निधन

उदेशी यांच्यावर चेन्नईत मागील काही दिवसांपासून उपचार सुरु होते.

Pramod Yadav

Go Goa Gone Producer Mukesh Udeshi Dies: बॉलिवूड चित्रपट निर्माता मुकेश उदेशी यांचे चेन्नईत निधन झाले आहे. किडनी संबधित आजारामुळे उदेशी यांचे निधन झाल्याची माहिती समोर येत आहे.

उदेशी यांच्यावर चेन्नईत मागील काही दिवसांपासून उपचार सुरु होते. सोमवारी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पश्चात पत्नी आणि मुलगा असा परिवार आहे.

मुकेश उदेशी यांनी अनेक प्रसिद्ध चित्रपटांची निर्मिती केली होती. यामध्ये सैफ अली खानची प्रमुख भूमिका असलेला गो गोवा गॉन, उर्मिला मातोडकरचा कौन, सिद्धार्थ मल्होत्राचा एक व्हिलन आणि चश्मे बहाद्दूर या चित्रपटांचा समावेश आहे.

याशिवाय त्यांनी अनेक प्रसिद्ध तेलगु चित्रपटांची देखील निर्मिती केली आहे. यात प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेते चिरंजीवी यांची प्रमुख भूमिका असलेल्या चित्रपटाचा समावेश आहे.

मुकेश उदेशी यांच्या निधनामुळे चित्रपटविश्वातून हळहळ व्यक्त होत आहे. उदेशी यांच्या निधनाने चित्रपट सृष्टीचे मोठे नुकसान झाल्याची भावना कलाविश्वातून व्यक्त केली जात आहे.

मुकेश उदेशी मागील काही दिवसांपासून किडनी संबधित आजारांवर उपचार घेत होते. त्यांचे मित्र आणि ज्येष्ठ चित्रपट निर्माते परवेश सिप्पी यांनी एका वृत्तपत्राला दिलेल्या माहितीनुसार, उदेशी यांच्यावर किडनी सर्जरी करण्यात आली होती.

किडनी प्रत्यारोपन करण्याची तयारी देखील त्यांनी दर्शवली होती. अल्लू अरविंद त्यांची सर्व काळजी घेत होते. दरम्यान, या ऑपरेशनपूर्वीच त्यांने श्वास सोडला अशी माहिती सिप्पी यांनी दिली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Cyber Crime: मोठा परतावा देण्याचं आमिष दाखवून 1.52 कोटींचा गंडा, सायबर फसवणूक प्रकरणी मुंबईतून एकाला अटक; गोवा पोलिसांची कारवाई!

IND vs WI 2nd Test: 38 वर्षांपासून एकही पराभव नाही, 'दिल्ली'चं मैदान टीम इंडियासाठी लकी; जाणून घ्या काय सांगते आकडेवारी?

Goa Crime: ग्रील कापून घरात घुसले, दाम्पत्याला बांधून ठेवलं, 50 लाखांचा ऐवज केला लंपास; म्हापशात बुरखाधारी दरोडेखोरांची दहशत

Nobel Prize Physics 2025: भौतिकशास्त्राचे नोबेल जाहीर! क्वांटम मेकॅनिकल टनलिंगच्या शोधासाठी तीन शास्त्रज्ञांचा गौरव

Horoscope: उद्याचा दिवस खास! 8 ऑक्टोबर रोजी शुभ धन योगामुळे 5 राशींचे भाग्य उजळणार, गणेशाचा असेल विशेष आशीर्वाद

SCROLL FOR NEXT