Mopa Airport Photos | Mopa International Airport | Mopa Airport | Goa International Airport  Dainik Gomantak
गोवा

Mopa International Airport: इंडिगो नंतर 'ही' एअरलाइन मोपा विमानतळावरुन उड्डाणासाठी सज्ज

गो फर्स्टने मोपा विमानतळावरुन थेट 42 उड्डाणे नियोजित असल्याचे म्हटले आहे

दैनिक गोमंतक

Goa Mopa Airport : गोवा राज्यातील दुसरे आंतरराष्ट्रीय विमानतळ अर्थात मोपा विमानतळाचे उद्घाटन काही तासांवर आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे या विमानतळाचे उद्घाटन 11 डिसेंबर 2022 रोजी करणार आहेत. या पार्श्वभूमीवर आज गो फर्स्ट एअरलाइन्सने आपल्या विमानतळावरील उड्डाणांचे नियोजन जाहीर केले आहे.

(Go First announced 42 direct flights to Mopa Airport)

मिळालेल्या माहितीनुसार मोपा येथे गोवा राज्यातील दुसरे आंतरराष्ट्रीय विमानतळ सुरु होत आहे. याचे उद्घाटन 5 जानेवारी होणार आहे. याच दिवशी गो फर्स्ट एअरलाइन्सने आपली विमान सेवा सुरु करणार असल्याचे म्हटले आहे.

तसेच मोपा विमानतळावरुन 42 उड्डाणे नियोजीत असल्याचे म्हटले आहे. त्यानंतर उर्वरित उड्डाण सुरु केली जाणार आहेत. सध्या उपलब्ध असलेल्या नेटवर्कनुसार, गो फर्स्टची थेट विमान उड्डाणे गोव्याला मुंबई, बेंगळुरू आणि हैदराबादला जोडणार आहे.

दाबोळी विमानतळावरील उड्डाणाबाबत केले स्पष्ट

गो फर्स्ट एअरलाइन्सची विमान सेवा दाबोळी विमानतळावरुन सुरु होत आहे. यानंतर आता दाबोळी विमानतळावरुन आपली विमान सुरु ठेवणार का? याचे स्पष्टीकरण दिले आहे. त्यानुसार ही विमानसेवा कोणत्याही प्रकारे बदल न करता आहे त्या स्थितीत सुरु ठेवली जाणार असल्याचे म्हटले आहे.

एअरलाइन्सच्या विमान सेवेबद्दल माहिती देताना गो फर्स्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी कौशिक खोना म्हणाले कि “आम्ही गो फर्स्टचे नेटवर्क विस्तारत आहे. यामुळे गोवा हे देखील आमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे ठिकाण आहे. आम्हाला आमची विमान सेवा मजबूत करताना आनंद होत आहे, आता नवीन ग्राहकांना अधिक चांगल्या प्रकारे सेवा देण्याचा प्रयत्न असणार आहे असे ते यावेळी म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

England Cricket Team: इंग्लंड क्रिकेटमध्ये मोठी उलथापालथ! स्टीफन फ्लेमिंग यांची प्रशिक्षकपदी वर्णी, जो रूटवर पुन्हा नेतृत्वाची जबाबदारी

Flight Viral Video: विमानात पॉवर बँकला अचानक आग; प्रवाशांमध्ये एकच गोंधळ, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

WWE News: 'SummerSlam 2026'पूर्वी WWE ला मोठा धक्का! 'मानधन अपेक्षेपेक्षा कमी मिळायचं' म्हणत स्टार रेसलरने ठोकला रामराम

Ramayana Trailer Reaction: 'रामायण: पार्ट 1'च्या ट्रेलरची चर्चा! रणबीरचं तेजस्वी रूप अन् यशचा रौद्र अवतार, चाहते मात्र नाराज; म्हणाले, 'हनुमान कुठे?'

Cutbona Jetty Fishing Season: कुटबण जेटीवर नव्या मासेमारी हंगामाची लगबग; हवामान, मजूर टंचाईची मच्छीमारांनी चिंता व्यक्त केली

SCROLL FOR NEXT