Dabolim Airport Dainik Gomantak
गोवा

Dabolim Mopa Airport: फ्लाईट स्थलांतरित करण्यासाठी GMR दबावतंत्र वापरतेय; मंत्री माविन गुदिन्हो

स्पीड गवर्नर नसलेल्या रेंट कॅब जप्त करुन त्यांचे परवाने रद्द करण्याचे निर्देश गुदिन्हो यांनी दिले.

Pramod Yadav

Dabolim Mopa Airport

कतार एअरवेजने नुकतेच येत्या २० जूनपासून दाबोळीवरील ऑपरेशन्स मोपावर स्थलांतरित करण्याची घोषणा केलीय. यानंतर दाबोळी विमानतळ घोस्ट होईल, अशी भीती विरोधकांकडून व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळावरील जीएमआर कंपनी दबावतंत्राचा वापर करत असल्याचा आरोप पंचायत आणि वाहतूक मंत्री माविन गुदिन्हो यांनी केला आहे.

रस्ते सुरक्षेशी संबंधित समस्यांचे निराकरण करण्यासाठी परिवहन विभाग, वाहतूक पोलिस, PWD आणि प्रमुख भागधारक यांच्या प्रतिनिधींसोबत पंचायत आणि वाहतूक मंत्री माविन गुदिन्हो यांनी यांच्या अध्यक्षेत बैठक पार पडली.

माविन गुदिन्हो यांनी रस्ता सुरक्षेच्या सद्यस्थितीचा आढावा घेतला आणि अपघातांच्या वाढत्या संख्येबद्दल चिंता व्यक्त केली. अपघात कमी करण्यासाठी PWD ला रस्त्याचे डिझाइन, सिग्नल आणि ट्रॅफिक सिग्नलवर सक्रियपणे काम करण्याचे आवाहन माविन यांनी केले.

सरकार राज्यातील अपघातांचा धोका कमी करण्यासाठी सर्व आवश्यक पावले उचलत आहे, असे मंत्री म्हणाले.

तसेच, लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी १२ ब्लॅक स्पॉट्सचे काम हाती घ्या. स्पीड गवर्नर नसलेल्या रेंट कॅब जप्त करुन त्यांचे परवाने रद्द करण्याचे निर्देश गुदिन्हो यांनी दिले.

याशिवाय राज्यातील ९० जागांवर एआय कॅमेरे बसविण्याचे, निर्देश वाहतूक मंत्री माविन गुदिन्हो यांनी अधिकाऱ्यांनी दिले आहेत.

यावेळी मंत्री माविन गुदिन्हो यांनी दाबोळी आणि मोपा विमानतळाबाबत भाष्य केले.

दाबोळी विमानतळावरुन मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळावर फ्लाईट्स स्थलांतरित करण्यासाठी जीएमआर कंपनी केंद्रीय पातळीवर दबावतंत्राचा वापर करत असल्याचा आरोप मंत्री माविन गुदिन्हो यांनी केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT