GMC Online Appointment Dainik Gomantak
गोवा

GMC Goa: ‘गोमेकॉ’त‘ऑनलाईन अपॉईंटमेंट’चा पहिल्या दिवशी 181 रुग्‍णांना लाभ, 5 ओपीडींसाठी सेवा Video

GMC Online Appointment: गोमेकॉत दररोज गोव्‍यासह शेजारील महाराष्‍ट्र आणि कर्नाटकातील रुग्‍णही दाखल होत असतात. त्‍यामुळे प्रत्‍येक विभागात रुग्‍णांच्‍या सकाळपासूनच रांगा लागलेल्‍या असतात.

गोमन्तक डिजिटल टीम

GMC Goa online appointment : बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालयातील (गोमेकॉ) मेडिसिन, सर्जरी, त्वचा, ईएनटी आणि अस्थिरोग या पाच ओपीडींमधील रुग्‍णांच्‍या रांगा कमी करण्‍यासाठी आणि यासंदर्भातील रुग्‍णांना तत्‍काळ उपचार देण्‍यासाठी प्रशासनाने सुरू केलेल्‍या ऑनलाईन अपॉईंटमेंट बुकिंग सेवेचा बुधवारच्‍या पहिल्‍या दिवशी १८१ जणांनी लाभ घेतल्‍याची माहिती ‘गोमेकॉ’चे अधीक्षक डॉ. राजेश पाटील यांनी गुरुवारी ‘गोमन्‍तक’शी बोलताना दिली.

गोमेकॉत दररोज गोव्‍यासह शेजारील महाराष्‍ट्र आणि कर्नाटकातील रुग्‍णही दाखल होत असतात. त्‍यामुळे प्रत्‍येक विभागात रुग्‍णांच्‍या सकाळपासूनच रांगा लागलेल्‍या असतात. या रांगा कमी करण्‍याच्‍या आणि प्रतीक्षा वेळ कमी करण्‍याच्‍या हेतूने बुधवारपासून मेडिसिन, सर्जरी, त्वचा, ईएनटी आणि अस्थिरोग या ओपीडींसाठी ऑनलाईन अपॉईंटमेंट बुकिंग सेवा सुरू करण्‍यात आली.

ऑनलाईन अपॉईंटमेंट बुकिंगसाठी गोमेकॉच्या ऑनलाईन अपॉंईंटमेंट पोर्टलवर मोबाईल क्रमांक द्यावा लागतो. त्‍यानंतर त्या मोबाईल क्रमांकावर आलेला ओटीपी दिल्यावर रुग्णांचे प्रोफाईल ओपन होते. याआधी रुग्णाची नोंद केली नसल्यास नवीन नोंदणी करावी लागते.

नोंदणी करताना दीनदयाळ स्‍वास्‍थ्‍य सेवा योजना (डीडीएसएसवाय) किंवा ‘आभा’ क्रमांकाची माहिती भरावी लागते. यानंतर रुग्णाविषयी अन्य माहिती द्यावी लागते. आवश्यक सर्व माहिती भरल्यानंतर १०० रुपये नोंदणी शुल्क यूपीआय अथवा अन्य ऑनलाईन पद्धतीने भरावे लागते. हे नोंदणी शुल्क दोन वर्षांसाठी ग्राह्य धरण्‍यात येते. पेमेंट यशस्वी झाल्यानंतर रुग्‍णाला एमआर क्रमांक दिला जातो. त्‍यानंतर प्रोफाईल निवडून रुग्‍णाला आवश्यक असणारा विभाग निवडावा लागतो.

सात दिवसांत निर्धारित वेळेत मिळेल लाभ

ऑनलाईन अपॉईंटमेंट बुकिंग सेवा सुरू होताच बुधवारच्‍या पहिल्‍या दिवशी १८१ रुग्‍णांनी या सेवेचा लाभ घेतला. त्‍यातील ४५ रुग्‍णांनी पाच विभागांत जाऊन उपचारही घेतले आहेत. या सेवेचा लाभ घेतलेल्‍या रुग्‍णांना सात दिवसांत मिळालेल्‍या वेळेत संबंधित विभागांत जाता येणार असून, त्‍यांना केसपेपरही तिथेच मिळेल. या सेवेमुळे या पाच विभागांतील रुग्‍णांच्‍या रांगा कमी होऊन रुग्‍णांना तत्‍काळ उपचार मिळणे सोपे होणार असल्‍याचेही डॉ. राजेश पाटील यांनी नमूद केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Iran Secrets Leak: इराण युद्धाचे सीक्रेट्स लीक? ट्रम्प सरकारकडून 50 हून अधिक अधिकाऱ्यांची 'पॉलीग्राफ टेस्ट'; पँटागॉनच्या इतिहासातील सर्वात मोठा तपास

Goa Crime: नातेवाईक महिलेसोबत भांडण अन्... तरुणाने स्वतःच्या पोटात चाकू खुपसून संपवलं आयुष्य, पोलिस तपास सुरू

Goa Crime: 11 वर्षांच्या शिक्षेला ब्रेक! अल्पवयीन विद्यार्थिनीवरील लैंगिक अत्याचार प्रकरणी मोठी घडामोड; 60 वर्षीय आरोपीला सशर्त जामीन

कुस्तीच्या आखाड्यात जिंकली, पण आयुष्याच्या पटावर हारली! सासरच्या त्रासाला कंटाळून 3 लेकरांसह महिला पैलवानानं उचललं टोकाचं पाऊल; 2 मुलांचा मृत्यू, 1 गंभीर

Goa Sports: गोव्याचे खेळाडू पदकासाठी सज्ज; जम्मू-काश्मीरमध्ये रंगणार राष्ट्रीय सेपॅक टाकरो स्पर्धा

SCROLL FOR NEXT