Siddhi naik Case Dainik Gomantak
गोवा

Siddhi Naik Case| सिद्धी नाईक प्रकरण सीबीआयकडे द्या!

तारा केरकर : वर्ष उलटले, तरीही तपास लागेना

दैनिक गोमन्तक

पणजी: भाजपच्या नेत्या सोनाली फोगट यांच्या मृत्यूचे प्रकरण आता सीबीआयकडे देण्याची मागणी केली जात आहे. परंतु, तत्पूर्वी सरकारने गोव्यातील मुलींना न्याय दिला पाहिजे. सिद्धी नाईक या युवतीच्या संशयास्पद मृत्यूला एक वर्ष उलटून गेले असले, तरी अजूनही चित्र स्पष्ट झालेले नाही.

(Give Siddhi Naik case to CBI in goa)

त्यासाठी या गरीब गोमंतकीय मुलीला न्याय देण्यासाठी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी हे प्रकरण सीबीआयकडे देण्याची वेळ आली आहे, अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्या तारा केरकर यांनी केली.

पणजी येथे त्या पत्रकारांशी बोलत होत्या. सिद्धीचा मृत्यू गूढ होता. त्या प्रकरणात नेमके काय घडले हे सत्य लोकांपर्यंत पोहोचले पाहिजे. तिचा मृतदेह नग्नावस्थेत सापडल्यानंतर हा खून असल्याचा संशय तिच्या पालकांनी व्यक्त केला होता. परंतु, सीबीआयकडे प्रकरण देण्याएवजी ते गोवा पोलिस खात्याच्या गुन्हे अन्वेषण शाखेकडे दिले.

यात काहीच प्रगती झालेली नाही. हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न सध्या सुरू आहे. आता गृह खाते सांभाळणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी संवेदनशीलता दाखवून हे प्रकरण सीबीआयकडे द्यावे. कारण एक वर्ष उलटून गेले तरी प्रकरणात तपास पुढे जात नाही. त्यासाठी मुख्यमंत्र्यांनी दखल घेण्याची आवश्‍यकता आहे, असे केरकर म्हणाल्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

FDA Raid: गणेश चतुर्थीपूर्वी 'एफडीए'ची मोठी कारवाई! मडगाव, केपे, धारबांदोड्यात तब्बल 430 किलो अन्नसाठा नष्ट

8th Pay Commission: '68,000 किमान वेतन आणि जुनी पेन्शन हवीच!' चंदीगड बैठकीपूर्वी सरकारी कर्मचाऱ्यांनी मांडल्या मोठ्या मागण्या; काय घेणार सरकार निर्णय?

Goa Police Reshuffle: गोवा पोलिस दलात मोठे फेरबदल! IPS अधिकाऱ्यांसह 12 पोलिस निरीक्षकांच्या बदल्या; दक्षिण गोवा एसपीपदी अक्षत आयुष

Mazi Bus Scheme: खासगी बसचालकांसाठी खुशखबर! 'माझी बस' योजनेत किलोमीटरमागे 5 रुपये अनुदान; जुन्या बस बदलण्यासाठी 10 लाखांपर्यंत मदत

Congo School Fire: कांगो हादरले! दोन शाळांमध्ये भीषण अग्निकांड, 26 विद्यार्थ्यांचा मृत्यू; थरकाप उडवणारा VIDEO समोर

SCROLL FOR NEXT