Gitali Talavalikar  Dainik Gomantak
गोवा

फोंडा नगराध्यक्षपदी गिताली तळावलीकर

प्रतिस्पर्धी उमेदवार प्रदीप नाईक यांना सात तर गिताली तळावलीकर यांना आठ मते मिळाली.

दैनिक गोमन्तक

फोंडा: फोंडा पालिकेच्या नगराध्यक्षपदासाठी मंगळवारी 11 रोजी खास बैठक झाली. शांताराम कोलवेकर यांनी नगराध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर पाचव्या नगराध्यक्षाचे वेध पालिकेला लागले होते. नगराध्यक्षपदासाठी गिताली तळावलीकर व प्रदीप नाईक स्पर्धेत होते. मात्र, गिताली तळावलीकर यांच्या गळयात विजयाची माळ पडली आहे. त्यांची फोंडा (Ponda) नगराध्यक्षपदी निवड झाली. प्रतिस्पर्धी उमेदवार प्रदीप नाईक यांना सात तर गिताली तळावलीकर यांना आठ मते मिळाली. (Ponda Municipality Election Latest News)

कुर्टी - खांडेपार पंचायतीत गेल्या साडेचार वर्षांत आठवेळा सरपंचाची निवड करण्यात आली आहे. फोंडा पालिकेतही गेल्या चार वर्षांतील आता पाचव्या नगराध्यक्षाची निवड झाली असून कुर्टी - खांडेपार पंचायतीनंतर फोंडा पालिकेतही संगीत खुर्चीचा खेळ सुरू असल्याच्या प्रतिक्रिया पालिकेतील नागरिकांकडून व्यक्त होत्या. नगरसेवक केवळ खुर्चीसाठी आटापिटा करीत असून विकासकामांवर विपरित परिणाम झाल्याच्याही प्रतिक्रिया नागरिकांनी (Citizens) व्यक्त केल्या.

संगीत खुर्चीचा खेळ

गेल्या 29 एप्रिल 2018 रोजी पालिकेच्या पंधरा प्रभागांसाठी निवडणूक झाली होती. त्यावेळी सुरवातीला प्रदीप नाईक, त्यानंतर व्यंकटेश ऊर्फ दादा नाईक, विश्‍वनाथ दळवी आणि शांताराम कोलवेकर असे चार नगराध्यक्ष होऊन गेले आणि आता पाचव्या नगराध्यक्षाची निवड झाली. फोंडा मतदारसंघातील कुर्टी - खांडेपार पंचायतीनंतर फोंडा पालिकाही संगीत खुर्चीच्या खेळात मागे नाही, हेच विद्ममान पालिका मंडळाने सिद्ध केल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Vs Oman: 126 धावांनी ओमानचा धुव्वा! गोव्याने परदेशात रचला मालिका विजयाचा इतिहास

Colvale Jail: ड्रग्ज, दरोड्यांचे कट अन् कारागृहातील मृत्यू; कोलवाळच्या भिंतीआड दडलंय काय? धक्कादायक वास्तवानं खळबळ

Goa Congress: वरवरची मलमपट्टी नको, मुळावर उपचार हवा! खर्गे आले, एकीचा संदेश दिला; पण काँग्रेसची अंतर्गत गटबाजी संपणार कधी?

Goa Politics: 'भाजपला हरवण्याआधी काँग्रेसने स्वतः एकवटावे', खर्गेंच्या आवाहनावर सरदेसाईंचा पलटवार; पक्षांतराची भीती

Goa Assembly Election 2027:'एकत्र लढू, एकत्र जिंकू'; गोवा विधानसभा निवडणुकीआधी खर्गेंचा काँग्रेस नेत्यांना विजयमंत्र

SCROLL FOR NEXT