संत सोहिरोबानाथ आंबिये शासकीय महाविद्यालयाच्या संकुलाचे उपराष्ट्रपतींच्या हस्ते उद्‌घाटन Dainik Gomantak
गोवा

गोव्यातील मुली इतर राज्यांसाठी प्रेरणादायी

उपराष्ट्रपती नायडू: संत सोहिरोबानाथ आंबिये शासकीय महाविद्यालयाच्या संकुलाचे उद्‌घाटन

Dainik Gomantak

Goa: विज्ञान, तंत्रज्ञान अभ्यासक्रमांबरोबरच मानव्य विद्या शाखाही महत्त्वाच्या आहेत. त्यामुळे सर्व विद्यापीठांनी त्या सुरू कराव्यात. गोव्यात उच्च शिक्षणामध्ये मुलींचे प्रमाण राष्ट्रीय सरासरीपेक्षा अधिक आहे. गोव्यातील विद्यार्थिनींचा शिक्षणातील रस वाखाणण्याजोगा असल्याने येथील मुली इतर राज्यांसाठी प्रेरणादायी आहेत, असे मत उपराष्ट्र्पती व्यंकय्या नायडू (Vice President Venkaiah Naidu) यांनी व्यक्त केले आहे.

विर्नोडा-पेडणे (Pernem) येथील संत सोहिरोबनाथ अंबिये शासकीय कला आणि वाणिज्य महाविद्यालयाच्या नवीन संकुलाचे उद्‌घाटन उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते हस्ते झाले. गोव्याचे राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री श्रीपाद नाईक, उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर उपस्थित होते.

नायडू म्हणाले, देशाला पाच ट्रिलियन डॉलर्सची अर्थव्यवस्था बनवायची आहे. यासाठी सर्व विद्या शाखा आणि क्षेत्र महत्त्वाची आहेत. यात ई-कॉमर्स ही महत्त्वाची भूमिका बजावू शकते. त्यामुळे विध्यार्थ्यांना सर्वंकष बनावे लागेल. देशाला समृद्ध सांस्कृतिक वारसा लाभला आहे, हा वारसा तरुण पिढीने जपणे गरजेचे आहे. इंग्रजी मानसिकतेतून बाहेर पडून आपल्या शिक्षण पद्धतीचे भारतीयकरण केले पाहिजे, जे देशाला ऋषीमुनी, आचार्यांनी दिले आहे.

मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी राज्यात शिक्षण क्षेत्रात सुरू असलेल्या विविध उपक्रमांची माहिती देत विद्यार्थ्यांना पुढे जाण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचे सांगितले.

राज्यपाल पिल्लई यांनीही मनोगत व्यक्त करताना गोव्याचा वारसा जपण्याबरोबरच विद्यार्थ्यांनी उज्ज्वल यश संपादन करावे, असे सांगितले. राज्याचे मुख्य सचिव परिमल राय यांनी आभार मानले.

उच्च शिक्षणात राज्यात मुली वरचढ

उच्च शिक्षणाच्या क्षेत्रात उत्तम कामगिरी केल्याबद्दल नायडू यांनी गोव्याचे कौतुक केले. महिलांसाठी उच्च शिक्षणात एकूण नाव नोंदणीचे राष्ट्रीय प्रमाण २७.३ टक्के आहे, तर गोव्यात हेच प्रमाण ३० टक्के आहे. उच्च शिक्षण घेण्यात राज्यातील मुली वरचढ आहेत, हे इतर राज्यांसाठी आदर्शवादी आहे, असे उपराष्ट्रपती नायडू म्हणाले.


अत्यंत देखणे नियोजन

संत सोहिरोबनाथ आंबिये शासकीय कला आणि वाणिज्य महाविद्यालयाची इमारत लाल-जांब्या दगडात उभारली असून, सर्व सोयींनीयुक्त अशी आहे, आजच्या उद्‍घाटनाच्या कार्यक्रमासाठी सुंदर विविध फळांची, फुलांद्वारे माटोळीची कमान सर्वांचे लक्ष वेधून घेत होती. मुख्य प्रांगणात पेडणे तालुक्यातील मान्यवरांच्या देखण्या मुर्त्या उभारल्या. यात संत सोहिरोबानाथ अंबिये, प्रभाकर पणशीकर, भाऊ दाजी लाड, अंजलीबाई मालपेकर आणि जीवबादादा केरकर यांचा समावेश होता. उद्‍घाटन सभागृह ही आकर्षक सजविण्यात आले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Shri Ram Digvijay Yatra: 'माझ्या मागे श्री रामाचे बळ'! बद्रीनाथ ते काणकोणपर्यंत श्रीराम दिग्विजय रथाचा प्रवास; चालकाचे 8000 किमी सारथ्य

Usgao: जिलेटीनचा स्फोट, दगडाची वाहतूक; उसगावात रात्री चालतो छुपा कारभार; बेसुमार डोंगरकापणीमुळे नागरिक भयभीत

Goa Road Repair: '15 दिवसांत रस्‍त्‍यावर एकही खड्डा दिसणार नाही', मंत्री कामत यांचे आश्वासन; कंत्राटदारांना निर्देश दिल्याचे स्पष्टीकरण

Goa Politics: खरी कुजबुज; युती कुणाला नको?

Goa Politics: 'त्यांना जर जवळ केले तर लोक काय म्हणतील'? फुटिरांच्या विरोधात LOP आलेमाव यांचा सवाल; इजिदोरच्या फॉरवर्ड प्रवेशावर नाराजी

SCROLL FOR NEXT