Goa Police 
गोवा

Missing Case: नोएडातून बेपत्ता झालेल्या लेकीच्या शोधात आई गोव्यात आली, दोन दिवसांत पोलिसांना कसा घेतला शोध?

Missing Case, Goa Police: बेपत्ता झालेल्या मुलीच्या भावाने गोवा पोलिसांचे कौैतुक करणारे पत्र लिहले असून, त्यांनी पोलिसांचे आभार मानले आहेत.

Pramod Yadav

Missing Case

नोएडा, उत्तर प्रदेश येथून बेपत्ता झालेल्या लेकीचा शोध घेण्यासाठी आई आणि तिचा मुलगा गोव्यात दाखल झाला. त्यांनी गोवा पोलिसांकडे बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केल्यानंतर दोनच दिवसांत पोलिसांनी बेपत्ता मुलीचा शोध घेतला.

गोवा पोलिसांनी तात्काळ तपास यंत्राणांच्या मदतीने घेतलेल्या शोधकार्याचे कौतुक बेपत्ता मुलीच्या भावाने केले आहे.

अंकुर कारला यांनी गोवा पोलिसांचे कौतुक करणारे पत्र लिहले आहे. कारला लिहतात ते 09 एप्रिल रोजी नोएडा येथून बेपत्ता झालेल्या बहिणीच्या शोधात गोव्यात आले. त्यांच्यासोबत त्यांची आई देखील होती. बहीण कुठे असेल, तिला काय झाले असेल या चिंतेत असणाऱ्या मायलेकांनी गोवा पोलिसांनी संपर्क साधून तक्रार दाखल केली.

पोलिसांनी तक्रारीची दखल घेत तात्काळ कारवाई करत, तपास यंत्रणांच्या मदतीने शोधकार्यास सुरुवात केली. पोलिसांनी राज्यातील विविध पोलिस स्थानकांना याबाबत माहिती दिली.

दोनच दिवसांत गोवा पोलिसांनी बेपत्ता झालेल्या बहिणीचा शोध घेतला, असे अंकुर यांनी गोवा पोलिसाचे आभार मानताना लिहलेल्या पत्रात म्हटले आहे.

बहीण सापडल्यानंतर तिला तात्काळ वैद्यकीय मदतीची गरज होती, गोवा पोलिसांनी तिला रुग्णालयात दाखल करुन उपचाराची व्यवस्था केली, असेही अंकुर यांनी पत्रात म्हटले आहे.

बहिणीच्या शोधकार्यात एसडीपीओ जिवबा दळवी यांची फार मदत झाल्याचा उल्लेख अंकुर यांनी करत त्यांचे आभार मानले आहेत. याशिवाय त्यांनी पणजी पोलिस स्थानकातील पोलिस विजयकुमार एस. चोडणकर आणि निलेश नाईक यांचे देखील कौतुक केले आहे.

गोवा पोलिसांची कर्तव्यदक्षता आणि जबाबदारीचे अनुपालन याबाबत त्यांनी गौरवोद्गार काढले आहेत. गोवा पोलिसांनी केलेल्या मदतीच्या कायम ऋणात असल्याचा उल्लेख अंकुर यांनी पत्रात केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Manik Elephant: 'माणिक हत्ती' 1200 किमी प्रवास करून 'वनतारा'त जाऊ शकेल का? गोवा खंडपीठाचे शारीरिक क्षमता तपासण्याचे आदेश Video

Goa ZP Election 2025: फोंडा तालुक्यातील कौल कोणाच्या बाजूने? भाजपची प्रतिष्ठा पणाला; विधानसभेची रंगीत तालीम

Goa ZP Election: जिल्हा पंचायत निवडणुकीसाठी यंत्रणा सज्ज! 300 हून अधिक पोलिस तैनात; मतदारसंघांमध्ये चुरस

Beach Shack sealed: हणजूण किनाऱ्यावरील प्रसिद्ध ‘कर्लिस बीच शॅक’ला टाळे! CRZ चे उल्लंघन; उपजिल्हाधिकाऱ्यांकडून कारवाई

'..मला 3 बुरखाधारी व्यक्तींनी अडवले'! शिक्षक ओरडतील या भीतीपोटी विद्यार्थ्याने रचले अपहरणनाट्य; अभ्यासाच्या ताणामुळे केला बनाव

SCROLL FOR NEXT