Girish Chodankar, Damu Naik  Dainik Gomantak
गोवा

Goa Politics: 'दामूं'ना मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार का जाहीर केले नाही? भंडारी समाजाला 'लॉलीपॉप' दाखवल्याचा चोडणकरांचा आरोप

Girish Chodankar: भंडारी समाजाविषयी वरवरचे प्रेम दाखविण्याचा प्रयत्न दामू नाईक यांना प्रदेशाध्यक्ष करून भाजपने दाखविले आहे, गिरीश चोडणकर यांचा टोला.

Sameer Panditrao

Girish Chodankar criticizes BJP for not announcing Damu Naik CM candidate

पणजी: भंडारी समाजाचा भाजपने केवळ वापर करून घेतला आहे. आत्तापर्यंत या समाजाकडे मतदार म्हणूनच पाहिले आहे. भंडारी समाजाविषयी वरवरचे प्रेम दाखविण्याचा प्रयत्न दामू नाईक यांना प्रदेशाध्यक्ष करून भाजपने दाखविले आहे.

एवढाच समाजाचा कळवळा असता, तर त्यांना मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार म्हणून जाहीर करायला हवे होते, असा सणसणीत टोला काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष व भंडारी समाजातील नेते गिरीश चोडणकर यांनी लगावला आहे.

भाजपने प्रदेशाध्यक्षपदी भंडारी समाजातील व्यक्तीस स्थान दिल्याचे भाजप सांगत असल्याने त्यावर चोडणकरांनी वरील प्रतिक्रिया दिली आहे. ते पुढे म्हणतात, भंडारी समाज भाजपपासून दूर गेला आहे. या समाजाला लॉलीपॉप दाखवून आपल्याकडे वळवण्याचा भाजपचा केविलवाणा प्रयत्न सुरू झाला आहे. भंडारी समाजावर सर्वात जास्त अन्याय भाजपने केले आहेत. कॅश फॉर जॉब प्रकरणात बहुजन समाजातील लोक अधिक पिळले गेले आहेत, या बहुजन समाजावर अन्याय भाजपने कसा केला हे सर्व समाजाने पाहिले आहे.

प्रदेशाध्यक्ष निवडीचा त्यांचा विषय आहे, पण भंडारी समाजाला एखादे पद द्यायचे आणि लालूच दाखवायचे यात भाजप तरबेज आहे. भंडारी समाज आता सज्ञान झाला आहे आणि त्यांना कोण काय करतो, हे माहीत आहे.
ॲड. अमित पालेकर
दामू नाईक यांच्याकडे नेतृत्व दिले हा चांगला निर्णय आहे. आपण भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर आपण युवा मोर्चाचे पदाधिकारी राहिलो. दामू नाईक हे आमचे तेव्हा युवा मोर्चाचे प्रभारी. मूळ कार्यकर्त्यांना सांभाळून घेणारे हे नेतृत्व आहे आणि त्यांना जे सहकार्य लागेल ते आपण करू.
दत्तप्रसाद नाईक

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Under 23 Cricket: कर्नल नायडू करंडकात गोव्याचा पराभव; बडोद्याची 4 विकेट्सनी बाजी

National Shilp Guru Award: गोव्याच्या मातीकलेचा राष्ट्रीय गौरव! अमर शेट यांना 'राष्ट्रीय शिल्पगुरू पुरस्कार'

Yuzvendra Chahal: वर्ल्ड कप 2023 मधून पत्ता का कट झाला? युजवेंद्र चहलचा मोठा खुलासा; म्हणाला, 'रोहित शर्माने मला आधीच सांगितले होते...'

Unnatural Death Case: नागव्यात 17 वर्षीय मुलाची आत्महत्या; हणजूण पोलिसांकडून तपास सुरू

Tesla Roadster Flying Car: रस्त्यावर धावणारी कार आता हवेतही उडणार! हेलिकॉप्टरसारखी लँडिंग, थ्रस्टरच्या मदतीने भन्नाट स्टंट Watch Video

SCROLL FOR NEXT