Girish chodankar said FIR must be filed against Milind Naik for Mormugao Municipal Council building restoration scam  Dainik Gomantak
गोवा

MMC Building Scam: मिलिंद नाईक यांच्यावर एफआयआर दाखल करा; चोडणकर

मुरगाव नगरपालिका ही चारशे पन्नास वर्षांपूर्वीची पुरातत्त्व इमारत असून त्याचे प्राणतत्त्व टिकून ठेवणे गरजेचे आहे

दैनिक गोमन्तक

वास्कोचे (Vasco) आमदार कार्लोस आल्मेदा यांनी नगरविकास मंत्री मिलिंद नाईक (Milind Naik) यांच्यावर मुरगाव नगरपरिषद इमारतीच्या जीर्णोद्धारामध्ये घोटाळा (MMC Building Scam) केल्याचा आरोप केला आहे. मुरगाव नगरपालिका ही चारशे पन्नास वर्षांपूर्वीची पुरातत्त्व इमारत असून त्याचे प्राणतत्त्व टिकून ठेवणे गरजेचे आहे दुरुस्तीच्या नावाखाली उगाच तिचे पुरावे नष्ट करणे बरोबर नाही. इमारतीचा साचा तसाच ठेवून त्याची डागडुजी करणे क्रमप्राप्त आहे इमारतीचे परत वस्तू नष्ट करून त्यावर पत्रे चढवले म्हणजे यात मोठा घोटाळा संबंधित अधिकाऱ्यांनी या घोटाळ्याची चौकशी करणे गरजेचे असल्याचे कार्लोस आल्मेदा म्हणाले होते.

"मुरगाव नगरपरिषद इमारतीचा जीर्णोद्धार करताना त्या इमारतीचे विद्रुपीकरण आणि नुकसान केले याप्रकरणी मिलिंद नाईक यांच्यावर एफआयआर दाखल करणे आवश्यक आहे,"असे गोवा कॉंग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष गिरीष चोडणकर (Girish chodankar) यांनी म्हटले आहे.

नगरविकास मंत्री मिलिंद नाईक हे भाजप पक्षाचे आहेत आणि वास्कोचे आमदार कार्लोस आल्मेदा हेही भाजप पक्षाचेच नेते आहेत त्यामुळे गोव्यात ाआत भाजप विरुद्ध भाजप असे युद्ध पेटले आहे. नगरविकास मंत्री मिलिंद नाईक यांच्या नेतृत्वाखालील पालिका इमारतीच्या नूतनीकरणात घोटाळाचा आरोप करण्यात आला. त्यावर मिलिंद नाईक यांनी आपली प्रतिक्रिया देतांना, "भाजप आमदार स्वतःच्याच सरकारवर आरोप करत आहेत हे आतिशय लज्जास्पद आहे. या कामात जर घोटाळा केला असेल तर त्यांनी माझ्या विरुद्ध तक्रार दाखल करावी. तसेच त्यांनी मला याकामात काय कमतरता आहे हेही कळविणे भाग होते. पण त्यांनी माझ्याकडे एकदाही तशी बोलणी केली नसल्याचे," मंत्री नाईक म्हणाले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: मुंबई इंडियन्सने शेअर केला चिमुकल्यांनी बनवलेल्या किल्ल्यांचा व्हिडिओ, फॅन्स म्हणाले, "म्हणूनच हा संघ आमच्यासाठी खास..."

Rama Kankonkar Attack: 'बेल' नाही, 'जेल'च! जेनिटोचा जामीन न्यायालयानं फेटाळला; तुरुंगातील मुक्काम वाढला

Gujarat Violence: धार्मिक कार्यक्रमावरून गुजरातमध्ये हिंसाचार; घरांची तोडफोड, 30 वाहने जाळली, 10 जखमी

भुसावळ ते गोवा थेट रेल्वे सेवेची मागणी! मुंबईचा त्रास टळणार; हजारो कोकणवासीयांचा वेळ आणि पैसा वाचणार

Rohit Sharma Record: सचिन, कोहलीला जे जमलं नाही, ते रोहित ऑस्ट्रेलिया मालिकेत करणार! फक्त 'इतक्या' षटकारांची गरज, विश्वविक्रम रचणार

SCROLL FOR NEXT