Girish Chodankar Dainik Gomantak
गोवा

Goa Politics: गिरीश चोडणकर यांचे अखेर दक्षिण गोव्‍यातून माघारीचे संकेत

Goa Politics: पत्रपरिषदेत माहिती : अल्‍पसंख्‍याक उमेदवारास आडकाठी नाही

दैनिक गोमन्तक

Goa Politics: दक्षिण गोवा लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसचा उमेदवार म्हणून मी अर्ज केला आहे. परंतु, तेथे अल्पसंख्याक उमेदवाराचे नाव विचाराधीन असेल, तर आपली त्यासाठी काहीही अडकाठी असणार नाही, असे स्पष्टीकरण काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी केले.

लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने काँग्रेस उमेदवारीविषयी चोडणकर यांनी आपली भूमिका मांडली. काँग्रेस भवनात पत्रकार परिषदेत ते बोलत होते. चोडणकर म्हणाले, गत निवडणुकीत पक्षाने आपणास लढण्याची सूचना केली, त्यामुळे आपण मैदानात उतरलो.

तत्पूर्वी २०१७ मध्ये पोटनिवडणूक लागल्याने मनोहर पर्रीकर यांच्याविरोधात काँग्रेसने दोन उमेदवार तयार ठेवले होते, परंतु त्यावेळी ऐनवेळी आपल्याला उमेदवारी स्वीकारून रिंगणात उतरवावे लागले.

आम आदमी पक्षाचा दक्षिण गोव्यातील उमेदवार दिल्लीतील नेत्याने जाहीर केला आहे. आम आदमी पक्ष, तृणमूल काँग्रेस हे ‘इंडिया‘ आघाडीचे घटक पक्ष आहेत.

इंडिया आघाडीचे नेते गोव्यातील उमेदवारीवर निर्णय घेतील, आपने उमेदवार जाहीर झाल्यानंतर आपली भूमिका स्पष्ट केली आहे. त्यामुळे इंडिया आघाडीकडून उमेदवार जाहीर होईल, असेही त्यांनी नमूद केले.

उत्तर गोव्यातून काही नावे

उत्तर गोव्यात पक्षाकडे ॲड. रमाकांत खलप, विजय भिके, राजन घाटे आणि संजय बर्डे यांच्यासारखे उमेदवार आहेत, त्यांची नावे यादीत आहेत आणि हे चांगले उमेदवार आहेत. आपण उत्तर गोवा लोकसभेच्या उमेदवारीचा विचार केलेला नाही.

दक्षिणेतून आपण उमेदवारी मिळावी म्हणून अर्ज दिला आहे. मात्र, दक्षिण गोवा लोकसभा मतदारसंघ अल्पसंख्यांक उमेदवाराच्या मागे राहणारा आहे, त्यामुळे त्याठिकाणी अल्पसंख्यांक उमेदवार देण्याचा विचार झाल्यास आपली काहीही हरकत राहणार नाही, असेही चोडणकर म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: धावत्या ट्रेनला लटकून स्टंटबाजी! 'हीरो' बनणाऱ्या पठ्ठ्याची मोडली खोड; नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली, म्हणाले, 'बरं झालं...'

Santa Cruz Bogus Voters: निवडणूक आयोगाविरोधात गोव्यातही काँग्रेसचा एल्गार! सांताक्रुझ मतदारसंघात 3 हजार बोगस मतदार

AUS vs SA: टी-20 मध्ये ग्लेन मॅक्सवेल पुन्हा रचणार इतिहास! 'या' एलिट खेळाडूंच्या यादीत होणार सामील; घ्याव्या लागणार फक्त 'इतक्या' विकेट्स

Goa Tribal Reservation Bill: आदिवासींसाठी 'सोनियाचा दिनु', राजकीय आरक्षण विधेयक राज्यसभेतही मंजूर; अनेक वर्षांच्या लढ्याला यश

Angaraki Sankashti Chaturthi: कर्ज आणि रोगांपासून मुक्ती हवी? जाणून घ्या अंगारकी चतुर्थीचा शुभ मुहूर्त आणि महत्त्व

SCROLL FOR NEXT