Girish Chodankar Complaint Against Giriraj Pai Vernekar And Sankalp Amonkar Dainik Gomantak
गोवा

‘संकल्प आमोणकर अन् गिरीराज वेर्णेकरांना अटक करा, चर्चवरील भाजपचा आरोप...’; चोडणकरांची तक्रार

Girish Chodankar: ख्रिस्‍ती धर्मगुरुंनी धार्मिक ध्रुवीकरण केले यामुळेच दक्षिण गोव्‍यात भाजपच्‍या उमेदवार हरल्‍या असा वारंवार प्रचार करुन भाजपला गोव्‍यात धार्मिक तेढ निर्माण करायची आहे.

Manish Jadhav

Girish Chodankar Complaint Against Giriraj Pai Vernekar And Sankalp Amonkar: यंदाच्या लोकसभा निवडणूकीत राज्यातील दोन्ही जागा आपण जिंकू असा विश्वास भाजपला होता. पण त्यांचे दोन्ही जागा जिंकण्याचे स्वप्न भंगले. भाजपला केवळ उत्तर गोव्याचीच जागा जिंकला आली. उत्तर गोव्यातून श्रीपाद नाईक यांनी बाजी मारली तर दक्षिण गोव्यातून विरियातो फर्नांडिस यांनी मैदान मारले. दक्षिण गोव्यात विरियातो यांचा विजय अनेक अर्थांनी खास ठरला. या मतदारसंघात अनेक राजकीय समीकरणे पाहायला मिळाली. काँग्रेसच्या उमेदवाराला अल्पसंख्यांक समुदयाची एकगठ्ठा मते मिळाल्याचे निकालानंतर विश्लेषण करण्यात आले. यावरुनच आता राज्यातील राजकारण गाजू लागले आहे.

ख्रिस्‍ती धर्मगुरुंनी धार्मिक ध्रुवीकरण केले यामुळेच दक्षिण गोव्‍यात भाजपच्‍या उमेदवार हरल्‍या असा वारंवार प्रचार करुन भाजपला गोव्‍यात धार्मिक तेढ निर्माण करायची आहे, असा आरोप प्रदेश काँग्रेसचे माजी अध्‍यक्ष गिरीश चोडणकर यांनी केला आहे. या आरोपांची पुनरावृत्ती केल्‍यामुळे मुरगावचे आमदार संकल्‍प आमोणकर आणि भाजपचे प्रवक्‍ते गिरिराज पै वेर्णेकर या दोघांविरोधात आज मडगाव पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली.

दरम्यान, ही तक्रार देताना चोडणकर यांनी मणिपूरचे उदाहरण दिले. भाजप नेत्यांकडून अशी तेढ निर्माण करणारी वक्तव्ये सातत्याने केली जात आहेत. मणिपूरप्रमाणेच गोव्‍यातही ख्रिस्‍ती धर्मगुरुवर हल्‍ला होऊ शकतो. त्‍यामुळे आमोणकर आणि वेर्णेकर यांच्‍याविरोधात धार्मिक तेढ निर्माण करण्‍याच्‍या आरोपाखाली भादंसंच्‍या 351 (A) तसेच धार्मिक भावना दुखावल्‍याच्‍या आरोपाखाली 295 (A) खाली गुन्‍हा नोंद करावा आणि त्‍यांना अटक करावी अशी मागणी चोडणकरांनी केली.

दक्षिण गोव्‍यात भाजप उमेदवार हरल्‍या त्‍या भाजप नेत्‍यांमुळे. नको असलेला उमेदवार दिल्‍यामुळे भाजपच्‍या कार्यकर्‍त्‍यांनीही त्यांच्यासाठी मतदान केले नाही. एवढेच नव्‍हे तर आतापर्यंत भाजपसाठी मतदान करणार्‍या बहुजन समाजानेही या पक्षाला झिडकारले. मात्र ही गोष्‍ट लोकांना कळू नये तसेच आपले अपयश लपवण्‍यासाठी भाजप नेते आता चर्चला दोष देऊ लागले आहेत, असेही चोडणकर पुढे म्हणाले.

वास्‍तविक, प्रत्‍येक निवडणुकीच्‍यावेळी चर्च आपल्‍या मार्गदर्शक सूचना जारी करते. यापूर्वी चर्चच्‍या अशा मार्गदर्शक सुचनांमुळेच गोव्‍यात भाजप सत्तेवर आला होता. मात्र आता हे भाजप नेते सपशेल विसरले आहेत. गोव्‍यात शांतता नांदावी आणि तेढ निर्माण करणारी वक्तव्य करण्यात येवू नये यासाठी अशा नेत्‍यांना अटक करुन गृहखाते सांभाळणाऱ्या मुख्‍यमंत्र्यांनी एक उदाहरण घालून द्यावे, अशी मागणी चोडणकरांनी केली.

दक्षिणेत गोव्यातील भाजपचा पराभव पाद्रींमुळे तसेच मतांच्या ध्रुवीकरणामुळे झाला. यासंदर्भात भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे यांनी केलेल्या वक्तव्याशी भाजप ठाम असल्याचा दावा आमदार संकल्प आमोणकर यांनी केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live Updates: प्रश्न सुटेपर्यंत मागे फिरणार नाही; पिळगावातील महिलांचा निर्धार

Vinayakan Viral Video: "याचं डोकं फिरलंय का"? जेलर फेम विनायकनचं भांडण होतंय व्हायरल; मल्याळी भाषेचा गोवेकरांना अर्थ लागेना

Rakul Preet Singh At IFFI: '..पार्ट्यांना हजेरी लावल्यामुळे चित्रपटांत भूमिका मिळत नाही'; रकुलप्रीतने Nepotism बद्दल मांडले स्पष्ट मत

Anupam Kher At IFFI: 'भिगा हुआ आदमी बारिशसे नहीं डरता'; अनुपम खेर अपयशाबद्दल म्हणाले की...

Elon Musk: भारताने एका दिवसात 640 मिलियन मतांची मोजणी केली, पण अमेरिकेत...; एलन मस्क बनले भारतीय वोटिंग सिस्टिमचे दिवाने

SCROLL FOR NEXT