Girish Chodankar  Dainik Gomantak
गोवा

Girish Chodankar : एसआयटीकडे ‘त्‍या’ घोटाळेबाज मंत्र्याचे नाव!

पर्वरी पोलिस व एसआयटीकडे दाखल झालेल्‍या तक्रारीत नामोल्लेख असल्याची गिरीश चोडणकर यांची माहिती

गोमन्तक डिजिटल टीम

Girish Chodankar : जमीन हडप प्रकरणात गुंतलेल्‍या मंत्र्याचे नाव एसआयटीला माहित आहे. मुख्‍यमंत्र्यांनी परस्‍पर त्‍यांच्‍याकडून ते नाव घ्‍यावे, तटस्‍थ चौकशी करावी. मी स्‍वत: एसआयटीकडे जाऊन हे नाव देईन याची वाट बघत बसू नये, असे आवाहन काँग्रेस पक्षाचे नेते गिरीश चोडणकर यांनी आज बुधवारी केले.

मुख्‍यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आपला कोणीही मंत्री जमीन हडप प्रकरणात गुंतलेला नाही, काँग्रेसने एसआयटीकडे कागदपत्रे सादर केल्‍यास आपण जरुर नि:पक्षपाती चौकशी करायला तयार असल्‍याचे मत व्‍यक्त केले होते. तत्‍पर्वी काँग्रेस नेते गिरीश चोडणकर यांनी भाजप सरकारमधील एक मंत्री जमीन हडप प्रकरणात सामील असल्‍याचे सांगून त्‍याला मंत्रिमंडळातून काढून टाकण्‍याचे आव्‍हान मुख्‍यमंत्र्यांना दिले होते. या विषयावर बोलताना चोडणकर म्‍हणाले की, गोवा मंत्रिमंडळातील एक सदस्‍य जमीन हडप प्रकरणात जरुर गुंतला आहे आणि तो मास्‍टरमाईंड म्‍हणता येईल असाच आहे. एसआयटीने अटक केलेल्‍या एका प्रमुख आरोपीने यापूर्वीच सदर मंत्र्याचे नाव एसआयटीला दिले आहे. शिवाय एसआयटीनेही यापूर्वी जमीन घोटाळ्‍यात राजकारणी गुंतल्‍याची माहिती पत्रकारांना दिली होती.

दरम्‍यान, गिरीश चोडणकर यांनी केलेल्‍या आरोपांमुळे यापूर्वी भाजप सरकारमधील माजी मंत्री मिलिंद नाईक यांना आपल्‍या पदाचा राजीनामा द्यावा लागला होता. त्‍यानंतर त्‍यांना भाजपने उमेदवारी दिली तरीही त्‍यांचा पराभव झाला होता. सध्‍या गिरीश चोडणकर यांच्‍या रडारावर असलेल्‍या मंत्र्यांबाबत सरकारी पातळीवर गुप्‍तपणे चौकशी चालू असल्‍याचे वृत्त आहे.

किमान तीन प्रकरणांत सहभाग

किमान तीन प्रकरणांत सदर मंत्र्याचे धागेदोरे सापडलेले आहेत. आपल्‍याकडे आणखी एक तक्रारही दाखल झालेली आहे, असे गिरीश चोडणकर म्‍हणाले. ‘पर्वरी पोलिस स्‍थानकात २० जुलै रोजी दाखल झालेल्‍या एका तक्रारीत तर सदर नेत्‍याचे नाव स्‍पष्‍टपणे घेतले आहे. सध्‍या पंचायतीने त्‍या जमिनीचे भूखंड पाडण्‍यास पवानगी दिली आहे. या जमिनीचे मूळ मालक पुण्‍याला राहतात आणि गोव्‍यात आल्‍यास आपल्‍या जीवाला धोका असल्‍याची भीती त्‍यांना वाटते. राजकीयदृष्‍ट्या बलवान असलेल्‍या लोकांनीच जर गैरव्‍यवहार केले तर सामान्‍य माणसाचे जीवन असुरक्षित नाही का बनणार? अशा सामान्‍य नागरिकांना अभय देणे सरकारचे कर्तव्‍य आहे. सखोल चौकशी न करता मंत्रिमंडळातील सर्व सदस्‍यांना क्‍लीन चिट देणे योग्‍य नव्‍हे, अशीही मल्लिनाथीही चोडणकर यांनी केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ireland Head Coach Resign: भारतविरुद्धच्या शानदार विजयानंतर आयर्लंडच्या मुख्य प्रशिक्षकांचा तडकाफडकी राजीनामा; गॅरी विल्सनकडे सोपवली जबाबदारी

Yuti Yog 2026: जुलै महिन्यात ग्रहांचा महाविनाशकारी खेळ! तीन वेळा बनणार 'अशुभ युती योग'; 5 राशींसाठी ठरणार काळ

'8th Pay Commission' ची प्रतीक्षा! सरकारी कर्मचाऱ्यांच्या 'त्या' 5 मागण्यांवर होणार शिक्कामोर्तब? जुलै महिन्यातील बैठकीकडे लक्ष

National Sub Junior Boxing Championship: गोव्याच्या कनिष्काला बॉक्सिंगमध्ये ब्राँझ, राष्ट्रीय सबज्युनियर स्पर्धेत मुलींच्या गटात चमकदार कामगिरी

First Marathi Woman in US Army: कोकणकन्येचा अटकेपार झेंडा! दापोलीच्या प्राजक्ता बोंगाळे अमेरिकी सैन्यात

SCROLL FOR NEXT