Organized 'Ghumt Gandha' competition by Gomantak Yin Dainik Gomantak
गोवा

Ghumt Musical Instrument: घुमटाला लवकरच मिळणार ‘जीआय’

Ghumt Musical Instrument: दीपक परब : गोवा विद्यापीठ आणि विज्ञान तंत्रज्ञान खात्याचे प्रयत्न; राज्याचे पारंपरिक वाद्य

दैनिक गोमन्तक

अनिल पाटील

Ghumt Musical Instrument: सर्वत्र गणेश चतुर्थीची धूम आहे. चोहोबाजूंनी घुमट गाज ऐकू येत आहेत. या घुमटाबाबत एक आनंद वार्ता असून घुमटाला भौगोलिक मानांकन अर्थात जिओग्राफिकल इंडेक्शन (जीआय) मिळवण्यासाठी सरकारच्या विज्ञान तंत्रज्ञान आणि पर्यावरण खात्याने केंद्रीय समितीकडे अर्ज पाठवला आहे, अशी माहिती जीआय मानांकन नोडल अधिकारी दीपक परब यांनी दिली आहे.

आपल्या प्रदेशनिष्ठ, भौगोलिक विशेष वैशिष्ट्यांमुळे वेगळेपण असणाऱ्या वस्तू आणि घटकांना केंद्रीय कॉमर्स आणि उद्योग खाते आणि इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी इंडियाच्या वतीने अनेक पडताळण्या करून बौद्धिक संपदा अधिकाऱ्यांतर्गत जीआय मानांकन दिले जाते. आतापर्यंत खोला मिरची, हरमल मिरची, मायंडोळी केळी, गोवन खाजे, मानकुराद आंबा, आगशी वांगी, बिबिंका, सातशिरो भेंडी, काजूगर या घटकांना जीआय मानांकन मिळाले आहे.

राज्यात अनेक वस्तू आणि घटकांना अशा प्रकारचे जीआय मानांकन मिळू शकते यावर संशोधन सुरू आहे. संशोधनाअंती त्या-त्या वस्तूंचा जीआयसाठी केंद्रीय समितीकडे अर्ज दाखल केला जातो. आता गोव्याचे पारंपरिक वाद्य असणाऱ्या घुमटाला जीआय मानांकन मिळावे यासाठी अर्ज करण्यात आला असल्याची माहिती परब यांनी दिली आहे.

शेळीच्या कातडीचा वापर

पूर्वी घुमटासाठी घोरपडीच्या (मॉनिटर लिझार्ट) कातडीला प्राधान्य दिले जात होते. पण आता वन्य जीव कायद्याच्या नियमानुसार घोरपडीची कातडी वापरू शकत नाहीत. त्याऐवजी शेळीच्या कातडीला प्राधान्य दिले जाते, ज्यामुळे आवाजाच्या ट्युनिंगमध्ये फरक पडत नाही.

‘घुमट’ तरुणाईमध्ये खूपच लोकप्रिय

गोवा घुमट हे हिंदूंच्या चतुर्थी, शिगमोत्सवामध्ये तर ख्रिश्‍चनांच्या सांजाव उत्सवात वापरले जाणारे लोकप्रिय वाद्य आहे.

घुमट आरती आता गोव्यातील तरुणाईमध्ये खूपच लोकप्रिय आहे आणि गोव्यातील महिला देखील घुमट वादन शिकण्यासाठी पुढाकार घेत आहेत.

विविध आरती स्पर्धांद्वारे कलाकारांना त्यांच्या सादरीकरणासाठी कला आणि संस्कृती विभागाकडून प्रयत्न केले जातात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT