Manohar International Airport Mopa Dainik Gomantak
गोवा

Manohar International Airport: गोवा आंतरराष्ट्रीय विमानतळावर भुताटकी? आमदार सरदेसाईंचं वादग्रस्त वक्तव्य

MLA Vijai Sardesai: गोवा विधानसभेचे सध्या पावसाळी अधिवेशन सुरु आहे. अधिवेशनादरम्यान विरोधक सरकारचा अनेक मुद्यांवरुन समाचार घेत आहेत.

Manish Jadhav

अंधाऱ्या ठिकाणी लहान मुलांनी जावू नये यासाठी अनेकदा आई-वडिल त्या ठिकाणी भूत आहे असे सांगतात. भूताच्या कहाण्या तुम्हीही अनेकदा आई-वडिल, आजी-आजोबा यांच्याकडून ऐकल्या असतील. पण इथे आता भूताबद्दल सांगण्याचं प्रयोजन असं आहे की, गोव्याच्या राजकारणात मोपा विमानतळावर भुताटकी असल्याचा मुद्दा चांगलाच गाजत आहे. गोवा विधानसभेचे सध्या पावसाळी अधिवेशन सुरु आहे. अधिवेशनादरम्यान विरोधक सरकारचा अनेक मुद्यांवरुन समाचार घेत आहेत.

दरम्यान, रात्री दहानंतर मोपा विमानतळावर (Mopa Airport) गोव्यातील कर्मचारी काम करत नाही. भुताटकीमुळे लोक तिथे जाणे टाळतात, असे गोवा फॉरवर्ड पक्षाचे सर्वेसर्वा आणि आमदार विजय सरदेसाई म्हणाले.

आमदार सरदेसाईंच्या या वक्तव्यावर जीत अरोलकर यांना विचारले असता, ते पहिल्यांदा खळखळून हसले. रात्री दहानंतर मला तर मोपा विमानतळावर असे काही दिसले नाही. लोक अशा प्रकारच्या कहाण्या रंगवून सांगतात. अशा गोष्टींमध्ये काहीही तथ्य नाही. त्यांच्या या म्हणण्यामध्ये तथ्य असते तर मोपा विमानतळ आतापर्यंत बंद झाले नसते का? भुताटकीचा धोका फक्त गोव्यातील लोकानांच आहे का? बाहेरचे लोकही इथे काम करतात. त्यांना तर याचा इथे काही त्रास नाही. जर इथे असं काही असेल तर याचा सगळ्यांनाचा त्रास होईल, असे जीत अरोलकर (Jit Arolkar) म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Tourism: गोव्यात पर्यटक वाढले तरी हॉटेल व्यावसायिक नाराज! रशियन, ब्रिटीश पर्यटकांची पाठ; हडफडे दुर्घटनेचा उत्तरेत परिणाम

Vijay Merchant Trophy 2025: सलग 5व्या पराभवासह गोव्याचा संघ घरी! विजय मर्चंट करंडकात हाराकिरी; कर्नाटक डावाने विजयी

Hardik Pandya: टीम इंडियाचा धक्कादायक निर्णय! न्यूझीलंडविरुद्ध हार्दिक पंड्या संघाबाहेर? बुमराहलासुद्धा विश्रांती

नाईटक्लब आगप्रकरणी केवळ वरच्या अधिकाऱ्यांवरच कारवाई का? राजकीय घटक मात्र नामानिराळे; किनाऱ्यांवरील बेकायदा ‘गोंधळ’ उघड

Goa Politics: ..काँग्रेसमध्ये भाजपला मदत करणारा ‘रोग’! एल्‍विस गोम्‍स यांचे टीकास्त्र; नेत्‍यांना ‘डिटॉक्‍स’ करण्‍याची गरज असल्याचा दावा

SCROLL FOR NEXT