गोवा

Margao Muncipality: घनश्याम शिरोडकर होणार मडगावचे नवे नगराध्यक्ष

नुकतेच भाजपात गेलेल्या माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांना धक्का

गोमन्तक डिजिटल टीम

आमदार दिगंबर कामत यांनी कांँग्रेस सोडून भाजपपरवेश केल्यानंतर दोनच दिवस उलटण्यापूर्वी आज त्यांना मडगाव नगरपालीकेवरील वर्चस्व गमवावे लागले आहे. तेथे अपक्ष नगरसेवक घनःश्याम शिरोडकर हे गोवा फाँरवर्डच्या पाठिंब्यावर नगराध्यक्षपदी निवडून आले. त्यांनी कामत यांचे उजवे हात गणले जाणारे दामोदर शिरोडकर यांचा 15 वि. 10 मतांनी पराभव केला..

(Ghanshyam shirodakar Independent candidate won Margao municipality chairperson election)

लिंडन परेरा यांच्या राजिनाम्याने रिक्त झालेले पद भरण्यासाठी आज पालिकेची खास बैठक बोलावली होती व तिला अतिरिक्त जिल्हाधीकारी श्रीनेत कोतवाले निर्वाचन अधिकारी म्हणून उपस्थित होते। त्यांना प्रभारी मुख्याधिकारी जयत तारी यांनी साह्य केले. मतदान गुप्तपध्दतीने झाले. या पदासाठी तीन उमेदवारु अर्ज दाखल झाले होते. पण आज शेवटच्या क्षणी सदानंद नाईक यांनी रिंगणातेन माघार घेतली व त्यामुळे धनःश्याम व दामोदर शिरोडकर यांच्यात सरळ लढत होऊन त्यात घनश्याम यांनी बाजी मारली.

नगरपालिकेची सदस्यसंख्या 25 असून भाजपचे 09, पूर्वीच्या माँडेल मडगावचे 07, फातोर्डा फाँरवर्डचे 08 व अपक्ष 01 असे बलाबल होते. त्यामुळे घनःश्याम यांना जी वरची पाच मते पडली ती कोणाची असा प्रश्न आता निर्माण झाला आहे.

आज नगरसेवकांना सभाग्रुहात जातानि भ्रमणध्वनी वा अन्य कसलेच कागदपत्रही नेण्यास मज्जाव केला होता.

निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यावर फातोर्डाचे आमदार विजय सरदेसाई यांनी नगरपालिकेत येऊन धनःश्याम यांचे हार घालून अभिनंदन केले. नंतर ते सगळे समर्थक नगरसेवकांसमवेत पिंपळकट्ट्यावर गेले व दामबाबाचे आशीर्वाद घेतले. तेथे बोलतानाघनःश्याम यांनी देवाचा आपणाला प्रसाद झाल्याचे सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Recruitment: तरुणांसाठी खुशखबर! निवड आयोगामार्फत 285 रिक्त जागांसाठी जाहिरात; 'या' पदांसाठी मागवले अर्ज

Vedanta Mining Dispute: पिळगावात दुसऱ्या दिवशीही खनिज वाहतूक बंद; शेतकरी मागणीवर ठाम

IFFI 2024: 'भूमी'चे गोमंतकीयांबद्दल गौरवोद्गार! म्हणाली की, लैंगिक भेदाकडे पाहण्याची दृष्टी...

Goa Crime: पुत्रविरहामुळे व्यथित होऊन 'त्याने' संपवले जीवन! सुसाईड नोटमध्ये केला पत्नी आणि तिच्या प्रियकरावर आरोप; Video मध्ये म्हणाला की...

Goa BJP: भाजप नेत्‍यांना पक्षशिस्‍त पाळण्याच्या सूचना! Cash For Job वर जाहीर वाच्‍यता नको; गाभा समितीच्या बैठकीत घमासान

SCROLL FOR NEXT