Gemini Nano Banana Dainik Gomantak
गोवा

Gemini Nano Banana: 'नॅनो बनाना'ची सर्वांनाच भुरळ; मुख्यमंत्री, आरोग्य मंत्र्यांनीही शेअर केले PHOTO

Pramod Sawant and Vishwajit Rane Nano Banana photo: समाज माध्यमांवर सध्या ‘थ्रीडी डिजिटल’ फोटोंचा ‘जेमिनाय २.५ फ्लॅश इमेज’ ज्याला ‘नॅनो बनाना’ असेही संबोधले जाते.

Sameer Amunekar

पणजी: समाज माध्यमांवर सध्या ‘थ्रीडी डिजिटल’ फोटोंचा ‘जेमिनाय २.५ फ्लॅश इमेज’ ज्याला ‘नॅनो बनाना’ असेही संबोधले जाते, हा नवीन फोटो ट्रेंड सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. प्रत्येकजण आपले अशा प्रकारचे फोटो तयार करून समाज माध्यमांवर टाकत आहेत.

गुगलच्या नवीन एआय वैशिष्ट्यांचा वापर करून तयार केलेले हे फोटो हुबेहूब आणि आकर्षक दिसत असल्याने सिनेसृष्टीतील सेलिब्रिटींपासून ते राजकारण्यांपर्यंत सर्वजण या नवीन टूलचा वापर करत आहेत. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सांवत तसेच आरोग्यमंत्री विश्‍वजित राणे यांचेही जेमिनाय फोटो समाजमाध्यमांवर झळकत आहे.

आरोग्यमंत्री विश्‍वजित राणे यांनी आपल्या सोशल मीडिया हॅण्डलवरून फोटो शेअर करताना म्हटले आहे की, युवकांशी संवाद साधणे नेहमीच उपयुक्त ठरते, तो केवळ संवाद नसतो, तर एक शिकण्याचा अनुभव असतो. त्यांच्या ट्रेण्ड्सशी जुळवून घेताना मी त्यांच्याकडूनच हे शिकलो आणि हे खास त्यांच्यासाठीच शेअर करत आहे.

सध्या मोफत : मार्च महिन्यात जीपीटी ४० लॉंच झाल्यानंतर गिल्बी स्टाईल फोटोंचा ट्रेंड आला होता. त्यावेळी देखील अशाच प्रकारे सर्वजण आपले फोटो शेअर करत होते. ‘नॅनो बनाना’ फोटो तयार करणारे एआय टूल काही सेकंदात आपल्या फोटोतील बारकाव्यांसह थ्रीडी मॉडेल तयार करते.

सध्या हे टूल मोफत आहे आणि त्याचे काही फीचर्स लिमिटेड आहेत. त्यामुळे अगदी सहजपणे फोटो तयार करता येते. चेहऱ्यावरचे हावभाव, कपडे तसेच इतर बाबी अचूक टिपत असल्याने आकर्षक वाटतात. त्यामुळे हा ट्रेंड अधिक व्हायरल होत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Recruitment Controversy: मनसे आयोजित नोकर भरतीवरुन गोव्यात राजकीय वादंग; फोंड्यात नोकरीसाठी कुडाळमध्ये मुलाखती का? आमदार सरदेसाईंचा भाजप सरकारला सवाल

सत्तरीत विचित्र घटना! भर बाजारात सापडली हाडं,परिसरात खळबळ; नेमकं काय घडलं? वाचा

Viral Video: चोराला लाथा-बुक्क्यांनी तुडवलं, बहाद्दर महिलेचा व्हिडिओ व्हायरल, नेटकरी अवाक; म्हणाले, 'ही तर ब्रूस लीची आजी...'

Goa Politics: काँग्रेसहून आलेले आठ आमदार 'डेंजर झोन'मध्ये; दामूंच्या 27 जागांचा संकल्प भाजपसाठी थट्टेचा विषय ठरणार?

BITS Pilani विद्यार्थी मृत्यू प्रकरणात मोठा ट्विस्ट; उलटीत सापडले तीन प्रकारचे ड्रग्ज, घटनेचे गूढ वाढले

SCROLL FOR NEXT