Geeta Salgaonkar Dainik Gomantak
गोवा

International Nurses Day : रुग्‍णांच्‍या चेहऱ्यावरील हास्‍य हेच आमच्‍या सेवेचे मोठे फळ

गीता साळगावकर : रुग्णांच्या सेवेत खूप मोठे समाधान

दैनिक गोमन्तक डिजिटल

योगेश मिराशी

आधुनिक नर्सिंगच्या संस्थापक लेडी फ्लोरेन्स नायटिंगल यांचा जन्म 12 मे 1971 मध्ये झाला आणि याच तारखेला जागतिक परिचारिका दिवस जागतिक स्तरावर साजरा केला जातो. या दिनाचे औचित्य साधून हळदोणा प्राथमिक आरोग्य केंद्रात काम करणाऱ्या साहाय्यक परिचारिका गीता चंद्रकांत साळगावकर यांच्याशी ‘गोमन्तक’ने संवाद साधला. त्‍यांना राष्ट्रपतींच्या हस्ते 2020 साली ‘नॅशनल फ्लॉरेन्स नाइटिंगेल नर्स’ पुरस्कार प्रदान करण्‍यात आलाय.

गीता साळगावकर म्हणाल्या की, "परिचारिका अहोरात्र मेहनत करून रुग्णांची सेवा करणारी, रुग्णांना धीर देणारी, त्यांचे मनोबल उंचावणारी तसेच रुग्णांच्या कुटुंबातीलच एक सदस्य बनून त्यांच्या आरोग्याची काळजी घेत असते. ज्यावेळी रुग्ण बरे होऊन घरी जातात तेव्‍हा त्यांच्या आणि त्‍यांच्या नातेवाईकांच्‍या चेहऱ्यावरील हास्य हेच आमच्या सेवेचे फळ असते."

"रुग्णांच्या सेवेत खूप मोठे समाधान आहे. मानवाची सेवा हीच खरी ईश्वरसेवा समजून मी हे फिल्ड निवडले. सुरूवातीला जवळपास १८ वर्षे एका खासगी इस्पितळात काम केले. त्यानंतर प्राथमिक आरोग्य केंद्रात ९ वर्षे कंत्राटावर काम केले. २०१७ पासून मी हळदोणा प्राथमिक आरोग्य केंद्रात काम करीत" असल्याचे गीता साळगावकर यांनी सांगितले.

कोरोना काळ आमच्‍यासाठी होता कसोटीचा

परिचारिका हा जॉब तसा आव्हानात्मक. मात्र कुटुंबीयांचे सहकार्य व पाठिंबा लाभल्याने मी या क्षेत्रात कुठल्याही अडचणींविना आजवर काम करू शकले. ती मग रात्रपाळीची सेवा असो किंवा आपत्कालीन स्थिती. कोविडच्या काळात देखील रुग्णांची सेवा करीत स्वतःची काळजी घेणे हे खूप आव्हनात्मक होते.

परंतु आम्ही मानवी सेवेत कुठेच खंड पडू दिला नाही, असे गीता साळगावकर मोठ्या अभिमानाने सांगतात. दरम्यान, अलीकडे अनेक आजार बळावताहेत. अशावेळी लोकांनी आपल्या आरोग्याची काळजी घेत नजीकच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात किंवा इस्पितळात जाऊन चाचणी करावी, असे आवाहनही त्‍यांनी केले.

"रुग्णालयात दाखल झालेल्या रुग्णांची अहोरात्र सेवा करण्‍याचे काम परिचारिका करीत असतात. रुग्णाला सकारात्मकता प्रदान करण्याचे काम आमचे असते. कोरोना काळात परिचारिकांनी आपल्या जीवाची पर्वा न करता दिवस-रात्र सेवा बजावल्या. कारण हा काळ आमच्यासाठी कसोटीचा होता. वैद्यकीय क्षेत्रात परिचारिकांचे योगदान अमूल्य आहे."

गीता साळगावकर, परिचारिका (हळदोणा प्राथमिक आरोग्य केंद्र)

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

"लग्न केवळ कागदावर उरलं असेल तर ते तोडणंच बरं!" 24 वर्षांपासून रखडलेल्या घटस्फोटाच्या वादावर सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निकाल

IPL Mini Auction 2026: केकेआरचा 'मास्टरस्ट्रोक'! मथीशा पाथिरानाला 18 कोटींत केलं खरेदी; सीएसकेच्या 'बेबी मलिंगा'वर शाहरुखने लावली मोठी बोली

Luthra Brothers Arrested: 'बर्च बाय रोमिओ लेन' च्या मालकांचा खेळ खल्लास! दिल्ली विमानतळावर लुथरा बंधूंना गोवा पोलिसांकडून अटक

IPL Mini Auction 2026: पैशांचा पाऊस! कॅमेरुन ग्रीनसह 'हे' 4 खेळाडू आयपीएल लिलावात मालामाल; मोडले सर्व रेकॉर्ड्स

Border 2 Teaser: 'लाहोरपर्यंत आवाज गेला पाहिजे...' पाकिस्तानला धडकी भरवणारा बॉर्डर 2 चा टीझर रिलीज; देओलचा रुद्र अवतार पाहून व्हाल अवाक VIDEO

SCROLL FOR NEXT