Ponda Water Pipeline: फोंड्यात उच्च क्षमतेच्या पाणी पाईपलाईन सुधारणा कामाचा शुभारंभ; रवी नाईक म्हणाले...

20 वर्षे जुनी कमी क्षमतेची पाईपलाईन बदलून उच्च क्षमतेची लाईन टाकली
Ravi Naik | Ponda Water Pipeline
Ravi Naik | Ponda Water PipelineGomantak Digital Team
Published on
Updated on

Ponda Water Pipeline: फोंड्याचे आमदार कृषी मंत्री आणि रवी नाईक यांनी फोंडा शहरातील साईनगर-दुर्गाभाट परिसरात ‘पाणी पाईपलाईन सुधारणा’ कामाचा शुभारंभ केला, ज्यामध्ये सुमारे 25 लाख रुपये खर्च करून जुनी पाईपलाईन बदलून नवीन पाईपलाईन टाकण्यात येणार आहे.

Ravi Naik | Ponda Water Pipeline
Dhavali Illegal Scrap Yard :ढवळीतील बेकायदा भंगारअड्डे हटवा

य़ावेळी रवी नाईक म्हणाले की, साईनगर-दुर्गाभाट भागातील जुनी पाईपलाईन बदलून नवीन पाईपलाईन टाकून रहिवाशांचा पाणीपुरवठा सुधारण्यावर भर दिला जाणार आहे.

ही जवळपास 20 वर्षे जुनी कमी क्षमतेची पाईपलाईन आहे आणि त्या भागाची सध्याची पाण्याची गरज जास्त आहे. हे लक्षात घेऊन सरकारने ती बदलून उच्च क्षमतेची लाईन टाकण्याचा निर्णय घेतला, जेणेकरून लोकांना चांगला पाणीपुरवठा होईल, असे नाईक म्हणाले.

ते पुढे म्हणाले की, फोंड्यातील सुधारणेच्या कामाची ही केवळ सुरुवात असून, पीएमसीला विश्वासात घेऊन विविध विकासकामे हाती घेण्याचे आमचे ध्येय आहे. आमदार निधीतून 2.5 कोटी रुपये पीएमसीच्या फायद्यासाठी वापरण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.

यावेळी नगरसेवकांनी या नवीन प्रकल्पाच्या सुरुवातीबद्दल आनंद व्यक्त केला आणि आगामी काळात असे आणखी उपक्रम राबविण्याची ग्वाहीही दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com