Sal River Dainik Gomantak
गोवा

GCZMA टीमने पर्यावरणाच्या नुकसानीचा घेतला आढावा

दरम्यान, साल नदीवरील बेटाची GCZMA टीमने केली पाहणी

दैनिक गोमन्तक

मडगाव: गोवा स्टेट कोस्टल झोन मॅनेजमेंट अथॉरिटी (GCZMA) च्या तीन सदस्यांनी शुक्रवारी साल नदीवरील एका बेटाची पाहणी केली आणि सध्या सुरू असलेल्या ड्रेजिंगमुळे पर्यावरणाचे किती नुकसान झाले याचा आढावा घेतला आहे. (GCZMA team reviewed the damage to the environment in Sal River case)

रॉय बॅरेटो आणि पारंपारिक मच्छीमार संघटनेचे अध्यक्ष अगोस्टिनहो फुर्टाडो यांच्या नेतृत्वाखाली भागधारकांच्या शिष्टमंडळाने त्यांना भेटल्यानंतर या उल्लंघन प्रकरणाचा शोध घेण्यासाठी बेटाची पाहणी करण्याची गरज व्यक्त केली होती. याची दखल घेत GCZMA सदस्य सचिव दशरथ रेडकर यांनी तीन सदस्यीय संघाची नियुक्ती केली.

दरम्यान रॉय यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले की, GCZMA टीमने ज्या बेटाची पाहणी केली ते बेट चिंचिनी आणि कार्मोना नदीच्या दरम्यान साल नदीत आहे.

“नियमांचे उल्लंघन करून बेटावर गाळ टाकल्याने खारफुटीचा नाश होत आहे,” असे ते म्हणाले.

पारंपारिक मच्छीमार आणि इतर भागधारकांनी साल नदीच्या (Sal River) ड्रेजिंगला कडाडून विरोध केला आहे, कारण स्थानिक मासेमारी समुदायांची उपजीविका या नदीवर अवलंबुन आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: 'गोव्याच्या किनाऱ्यावर...' परदेशी सुंदरींचा मराठी गाण्यावर भन्नाट डान्स, सोशल मीडियावर व्हिडिओ तूफान व्हायरल; तुम्ही पाहिलाय का?

Goa Election 2027: 'मिशन गोवा'साठी भाजपचा मास्टर प्लॅन तयार! राष्ट्रीय अध्यक्षांच्या उपस्थितीत रणनीतीवर शिक्कामोर्तब; विजयाची हॅट्ट्रिकसाठी 'जनसंपर्क पॅटर्न'

"गोवा म्हणजे जणू माझं घरच!", ऑस्ट्रेलियाचा 'हा' दिग्गज अष्टपैलू गोव्याच्या प्रेमात; जुन्या मित्रांच्या भेटीसाठी बेस्ट डेस्टिनेशन

Betim: सफर गोव्याची! डोंगर आणि नदी यांच्यामधील दुवा; निसर्गसंपन्न 'बेती'

पाकिस्ताननं 'B' टीमला हरवलं, पण जल्लोष वर्ल्ड कप जिंकल्यासारखा! शाहबाज शरीफ यांच्या 'प्राइड'वर आकाश चोप्राचा 'मास्टर स्ट्रोक'

SCROLL FOR NEXT