Siolim  Dainik Gomantak
गोवा

Siolim News : शिवोली स्वामी समर्थ मठात गवळण गायन स्पर्धा उत्साहात

Siolim News : श्री स्वामी समर्थ प्रकट दिनानिमित्त मठात आयोजित अखिल गोवा गवळण गायन स्पर्धेतील विजेत्यांना बक्षिसांचे वितरण करतेवेळी ते बोलत होते.

गोमन्तक डिजिटल टीम

Siolim News :

कळंगुट, हिंदू धर्म आणि सनातन संस्कृतीचे रक्षण करण्यासाठी गावोगावी सांस्कृतिक दर्जा वाढविणाऱ्या कार्यक्रमांवर भर देणे काळाची गरज असल्याचे शिवोलीतील स्वामी समर्थ मठाचे संस्थापक नीलेश वेर्णेकर यांनी सांगितले.

श्री स्वामी समर्थ प्रकट दिनानिमित्त मठात आयोजित अखिल गोवा गवळण गायन स्पर्धेतील विजेत्यांना बक्षिसांचे वितरण करतेवेळी ते बोलत होते.

यावेळी व्यासपीठावर तबलापटू सावळाराम बिटये गोवेकर, सुरेश केरकर, स्पर्धेत पुरुष गटात प्रथम बक्षीसप्राप्त गायक रितेश इंफाळकर, महिला गटातील हर्षदा गणपुले, हार्मोनियमवादक किशोर गोवेकर, पत्रकार संतोष गोवेकर आदी उपस्थित होते.

२८ स्पर्धकांनी या स्पर्धेत भाग घेतला. हार्मोनियमवर किशोर गोवेकर, मंजिरी रवी गोवेकर, पखवाज संजय च्यारी, गायक कलाकार सावळाराम बिटये गोवेकर यांनी संगीत साथ केली. सुरेश केरकर यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले.

सूत्रसंचालन संतोष गोवेकर, तर आभार संदीप च्यारी यांनी मानले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Accident: गोव्यात अपघातांचे सत्र थांबेना! 2 अपघातांत 2 तरुण ठार; डिचोलीत ‘हिट ॲण्ड रन’ची घटना

युनिटी मॉलपाठोपाठ डेल्‍टिन कॅसिनो, गेरा प्रकल्पाला विरोध! सरकारसमोर आव्‍हान; श्रीपाद नाईकांवर चिंबलवासीयांचा प्रश्नांचा भडीमार

Ranji Trophy: अर्जुन तेंडुलकर 1, तर राजशेखर शून्यावर बाद! 'दर्शन'ची एकाकी झुंज; गोव्याचा सलग तिसरा पराभव

Rashi Bhavishya: ..हाच तो दिवस! शुभवार्ता मिळणार; 'या' राशींनी तयार रहा

Bajirao Peshwa: निजाम पुण्यात घुसला, बाजीरावांनी आपला मोर्चा औरंगाबादकडे वळवला; अपराजित सेनापतीची ऐतिहासिक लढाई

SCROLL FOR NEXT