Murder of Gauri Acharya Dainik Gomantak
गोवा

स्कॉलर प्राध्यापिकेच्या खूनाने गोवा हादरला

सेलिब्रिटी जिमट्रेनरकडून खुनाची कबुली; एकतर्फी प्रेमप्रकरणातून हत्या झाल्याचा संशय

दैनिक गोमन्तक

एका स्कॉलर प्राध्यापिकेच्या खूनाने शुक्रवारी गोवा हादरून गेले. खांडोळा येथील सरकारी महाविद्यालयातील प्राध्यापिका डॉ. गौरी आचारी (37) यांचा गळा आवळून खून केल्याप्रकरणी त्यांचा मित्र तसेच जिम ट्रेनर गौरव प्रकाश बिद्रे (36) याला जुने गोवे पोलिसांनी अटक केली. हा खून एकतर्फी प्रेमप्रकरणातून झाला असल्याचा अंदाज पोलिसांकडून व्यक्त केला जात आहे. पोलिसांनी या हत्येचा 24 तासात छडा लावला. संशयिताला रिमांडसाठी शनिवारी न्यायालयात उभे केले जाणार आहे. (Gaurav Bidre murdered Professor Gauri Acharya )

जुने गोवे पोलिसांनी संशयित गौरव बिद्रे याच्या उपस्थितीत त्याने कदंब पठारावर झाडाझुडपात टाकून दिलेला गौरी यांचा मृतदेह ताब्यात घेण्यात आला. त्याने त्यांचा खून हाताने गळा आवळून केल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलिसांनी मृतदेह शव विच्छेदनासाठी गोमेकॉ इस्पितळात पाठवला आहे. हा अहवाल डॉक्टरांकडून मिळाला नसला तरी त्याने दिलेल्या खुनाच्या कबुलीनंतर खुनाचा तसेच पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

त्याने मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी स्वतःची गाडी (जीए 03 झेड 4869) वापरली होती. ती जप्त करण्यात आली आहे. जुने गोवे पोलिस स्थानकाचे निरीक्षक दिनेश गडेकर यांनी गौरवची चौकशी करून हत्येचा तपास उलगडला.

नेमके काय घडले ?

1. काही वर्षापूर्वी गौरव (सावंतवाडी माजी उपनगराध्यक्षाचा मुलगा ) याची गौरी यांच्याशी ओळख झाली होती. तो त्यांनाही जिमचे ट्रेनिंग देऊ लागला. त्यातून त्यांच्यामध्ये जवळीक निर्माण झाली. मात्र, काही दिवसांपासून त्यांच्यात वाद सुरू होता.

2. गुरुवारी संध्याकाळी 7 च्या सुमारास गौरी नॅनो गाडीने प्रायमोस पार्क येथे आली असता त्यापूर्वीच गौरव बिद्रे हा स्वतःची गाडी घेऊन आला होता. तो तिच्याशी बोलत असताना त्यांच्यात वाद झाला. रागाच्या भरात गौरवने तिच्या गाडीतच गळा आवळला. या झटापटीत तिचा मृत्यू झाला.

3. यानंतर गौरवने तिला उचलून नॅनो गाडीतून आपल्या गाडीच्या सीटवर बसवले व तेथून निघून गेला. तिच्या मृतदेहाची विल्हेवाट लावून तो कदंब पठारावरील फ्लॅटवर गेला.

4. गौरव बिद्रे हा सावंतवाडीचे माजी उपनगराध्यक्ष प्रकाश बिद्रे यांचा मुलगा आहे. गौरव यापूर्वी मुंबईत मॉडेल व जीम ट्रेनर म्हणून काम करीत होता. त्यावेळी त्याने बॉलिवूड कलाकारांना व उच्चभ्रू लोकांना जीम ट्रेनिंग देत होता. त्या दरम्यान त्याच्यावर एका महिलेने विनयभंगाची तक्रार दाखल केली होती. या घटनेची सावंतवाडीमध्ये मोठी चर्चा सुरू आहे.

संशयित गौरव हा सेलिब्रिटी प्रशिक्षक

संशयित आरोपी आणि त्यांची ओळख जुने गोवे येथील व्यायाम शाळेतच झाली असावी, असा कयास व्यक्त केला जात आहे. आरोपी गौरव बिद्रे जरी पणजीचा असला तरी तो जुने गोवे येथील व्यायाम शाळेत प्रशिक्षक होता आणि तेथेच त्यांची डॉ. गौरी यांच्याशी ओळख झाली असावी, असा संशय व्यक्त केला जात आहे. गौरव हा सेलिब्रिटी प्रशिक्षक मानला जात असे. त्याचा अभिनेता रणवीर सिंग सोबतचा फोटो व्हायरल होत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT