Gastroenterology In GMC Dainik Gomantak
गोवा

Gastroenterology In GMC : गोमेकॉत आता गॅस्ट्रोएन्टेरोलॉजी विभाग

आरोग्यमंत्री राणे : आयव्हीएफ सुविधेचा शुभारंभ, लाभार्थींना पत्रे

दैनिक गोमन्तक

Gastroenterology In GMC: राज्यातील जनतेला उत्तम तसेच आधुनिक आरोग्य सेवा देण्यासाठी खात्याचे प्रयत्न सुरू असून 19 डिसेंबरपूर्वी गोमेकॉत गॅस्ट्रोएन्टेरोलॉजी विभाग सुरू करण्यात येईल. तसेच गोमेकॉत लवकरच कर्करोगावरील अद्ययावत इम्युनो थेरपी सुरू होईल, अशी माहिती आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी दिली.

राज्य सरकारच्या वतीने प्रथमच वंधत्व निवारण आयव्हीएफ आणि आययुआय या अत्यंत महागड्या सुविधा जनतेसाठी मोफत सुरू करण्यात आल्या. या सुविधांचा शुभारंभ आरोग्यमंत्री राणे यांच्या हस्ते शुक्रवारी झाला.

यावेळी विभाग प्रमुख डॉ. केदार फडते, रुग्णालयाचे डीन डॉ. शिवानंद बांदेकर, अधिक्षक डॉ. राजेश पाटील, डॉ. म्युरेल कार्दोज, डॉ. अजित नगर्सेकर उपस्थित होते. यावेळी दहा लाभार्थ्यांना सुविधा मंजुरीची पत्रे देण्यात आली.

मंत्री राणे म्हणाले की, देशात प्रथमच या अत्याधुनिक महागड्या, आरोग्य सुविधा मोफत खुल्या करत आहोत. देशात ''दिल्ली मॉडेल''चा केवळ गवगवा आहे.

प्रत्यक्षात तिथे कोणत्या सुविधा मिळतात हे पाहावे लागेल. मात्र आम्ही अत्यंत आधुनिक अशा सर्व प्रकारच्या आरोग्य सुविधा उपलब्ध करून देत आहोत.

सध्या राज्यात पोटाच्या विकारांचे संबंधित आजार वाढत आहेत. यावर नियंत्रण आणि उपचार मिळाव्यात यासाठी जीएमसीत १९ डिसेंबर पूर्वी गॅस्ट्रोएन्टेरोलॉजी विभाग सुरू करत आहोत.

तर लवकरच कर्करोगावरील इम्युनो थेरपी सुरू होईल. यासाठी टाटा कॅन्सर रुग्णालयाशी करार झाला आहे. लवकरच या सुविधा राज्यात उपलब्ध होतील असेही ते म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT