Cylinders caught fire at Marine Workshop at Betim  Dainik Gomantak
गोवा

Porvorim Fire News: मरीन वर्कशॉपमध्ये सिलींडरने घेतला पेट; बेती येथील घटना

पर्वरी अग्निशामक दलाच्या जवानांनी मोहिम राबवीत आग विझवली

Rajat Sawant

Cylinders Caught Fire In Marine Workshop At Betim: बेती येथील एका आरएनटी वर्कशॉपमध्ये आग लागल्याची घटना घडली. गॅस वेल्डिंगवेळी सिलेंडरने पेट घेतल्याने आग लागली. सुदैवाने या आगीत जिवितहानी झाली नाही. ही घटना सोमवारी दुपारी घडली.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार बेती येथील एका आरएनटी वर्कशॉपमध्ये बोटीच्या डागडुजीचे काम चालू होते. यावेळी गॅस वेल्डिंग करताना अचानक गॅस सिलेंडरने पेट घेतला. तेथील कामगारांनी तत्काळ आगीची माहिती पर्वरी अग्निशामक दलाला देण्यात आली.

घटनेची माहिती मिळताच जवानांनी मोहिम राबवित आग विझवल्यामुळे दुर्घटना टळली. पर्वरी अग्निशामक दलाचे कर्मचारी मुकुंद गवंडी (सब ऑफिसर), लक्ष्मण परवार (ड्रायव्हर/ऑपरेटर), प्रशांत सावंत (फायर फायटर), महेश कोरगावकर (फायर फायटर), लक्षदीप हरमलकर (फायर फायटर) या मोहिमेत सहभागी झाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Horoscope: पैसा खळाळणार! त्रिपुष्कर योग ठरणार फलदायी; 'या' 5 राशींचे दिवस बदलणार

Goa Accident: डिचोलीत भीषण अपघात! बगलमार्गावर व्हाळशी जंक्शनजवळ वाहनाची झाडाला जोरदार धडक; कर्नाटकातील तिघे गंभीर जखमी

Chorao Ferryboat: निष्काळजीपणामुळे बुडाली होती 'बेती फेरीबोट'! चोडण दुर्घटनेबाबत बंदर कप्तान खात्याचा अहवाल सादर

Mapusa Fish Market: 'म्हापसेकरांना आणखी संकटात लोटू नये'! म्हापसा पालिकेला मासळी मार्केट अस्वच्छतेवर नोटीस; काँग्रेस करणार स्वच्छता

Shelvan Jetty: '..गावात जेटी होऊ देणार नाही'! शेळवण-कुडचडेवासीयांचा निर्धार; आमदार काब्राल यांची घेतली भेट

SCROLL FOR NEXT