LPG price hike protest Dainik Gomantak
गोवा

Goa Congress Protest: हातात फलक, डोक्यावर लाकडाची मोळी! काँग्रेस गॅस दरवाढीविरोधात आक्रमक, मडगाव भाजप कार्यालयासमोर निदर्शने

LPG Price Hike Protest: काँग्रेसचे दक्षिण गोवा जिल्‍हा अध्‍यक्ष सावियो डिसिल्‍वा यांनी सरकारने सामान्‍य लोकांचे कंबरडे मोडले आहेत असा दावा केला.

Sameer Panditrao

मडगाव: केंद्र सरकारने घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात ५० रुपयांची वाढ केल्‍याने हा दर प्रति सिलिंडर ८७० रुपयांवर पोचला आहे. याचा निषेध करण्‍यासाठी गुरुवारी काँग्रेस पक्षाच्‍या महिला कार्यकर्त्यांनी इतर कार्यकर्त्यांच्‍या समवेत मडगावच्‍या भाजप कार्यालयासमोर डोक्‍यावर लाकडाची मोळी घेऊन निदर्शने केली.

महिला काँग्रेस आणि दक्षिण गोवा जिल्‍हा काँग्रेस समितीने ही निदर्शने आयोजित केली होती.यावेळी काँग्रेसच्‍या मनिषा उसगावकर यांनी भाजप सरकारात महागाई एवढी वाढली आहे की, सामान्‍य लोकांचे जीणे मुष्‍कील झाले आहे.

त्‍यात आता गॅस सिलिंडरच्‍या किमतीही भढकल्‍याने गोव्‍यातील महिलांवर लाकडाचा वापर करून स्‍वयंपाक करण्‍याची वेळ येणार आहे असा दावा केला. काँग्रेसचे दक्षिण गोवा जिल्‍हा अध्‍यक्ष सावियो डिसिल्‍वा यांनी सरकारने सामान्‍य लोकांचे कंबरडे मोडले आहेत असा दावा केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT