Goa Gas Cylinder Dainik Gomantak
गोवा

LPG Gas Cylinder: 'गॅसमाफियांची आता खैर नाही'! छापेमारीची तयारी सुरू; काळाबाजार रोखण्‍यासाठी ‘मिशन’

Goa Gas Cylinder: गॅस सिलिंडरचा काळाबाजार रोखण्‍यासाठी नागरीपुरवठा खात्याने पोलिसांची मदत मागितली आहे. तसेच राज्यभर छापेमारीची तयारी सुरू केली आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

LPG Gas Cylinder Black Market Goa : गॅस सिलिंडरचा काळाबाजार रोखण्‍यासाठी नागरीपुरवठा खात्याने पोलिसांची मदत मागितली आहे. तसेच राज्यभर छापेमारीची तयारी सुरू केली आहे. तिन्ही जिल्ह्यांच्या पोलिस अधीक्षकांना यासंदर्भात अधिकृत विनंती करण्‍यात आली आहे.

नागरीपुरवठा खात्याचे कर्मचारी गॅस डिलर आणि गोदामांवर तैनात असतानाही सिलिंडर वाहतूक करणाऱ्या वाहनांतील चालक व साहाय्यकांकडून काळाबाजार होत असल्याचा संशय व्यक्त होत आहे.

व्यावसायिक वापरासाठी सुरुवातीला २० टक्के, त्यानंतर ४० टक्के आणि सध्या ६० टक्क्यांपर्यंत सिलिंडरचा पुरवठा वाढवण्यात आला आहे. मात्र, या वाढीचा लाभ प्रत्यक्ष ग्राहकांपर्यंत पोहोचत नसल्याचे दिसून येत आहे. मोठ्या प्रमाणावर सिलिंडर काळ्याबाजारात वळवले जात असल्याने ग्राहकांना चढ्या दराने सिलिंडर खरेदी करावा लागतोय.

ही स्थिती नियंत्रणात आणण्यासाठी सिलिंडर वाहतूक करणाऱ्या वाहनांवर पोलिसांच्या मदतीने छापेमारी करण्याची योजना आखण्यात आली आहे. आता लवकरच कारवाई सुरू करण्‍यात येईल.

नागरीपुरवठा खात्याच्या मागणीनुसार पोलिस कर्मचारी पुरवण्यात आले आहेत. गॅस सिलिंडरचा काळाबाजार रोखण्यासाठी ते मदत करतील. तसेच सिलिंडर टंचाईमुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍‍न निर्माण होऊ नये, यावरही लक्ष ठेवले जात आहे.

- हरिश्‍चंद्र मडकईकर, पोलिस अधीक्षक (उत्तर गोवा)

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Fish Market: गणपती विसर्जनानंतर मासळी मार्केट पुन्हा गजबजले; भाव ऐकून ग्राहकांच्या कपाळावर आठ्या, सुरमई 900 रुपये किलो

Modi Cabinet Reshuffle: मंत्र्यांचे ग्रेडिंग ठरवणार त्यांचे राजकीय भवितव्य! लवकरच बदलणार मोदी मंत्रिमंडळाचा चेहरामोहरा? दिल्लीच्या पॉवर कॉरिडोअरमध्ये हालचालींना वेग

Goa Weather: गोव्यात पुन्हा पावसाची हजेरी; शेतकऱ्यांना मोठा दिलासा, राज्यात 'यलो अलर्ट'

Rashol MRF Case: 'एमआरएफ'ची मूळ फाईल बीडीओकडे कशी पोहोचली? राशोल कचरा प्रक्रिया शेड प्रकरणात गोवा खंडपीठाचा सवाल

Online Services: सरकारची मोठी डिजिटल सुविधा; आता व्हॉट्स-ॲपवरून मिळणार सरकारी सेवा, AI चॅटबॉटचा शुभारंभ

SCROLL FOR NEXT