Ponda Fire News Dainik Gomantak
गोवा

Ponda Fire News : फोंड्यात कपड्यांच्या दुकानाला आग; लाखोंचा माल जळून खाक

दुकानाचे मोठ्या प्रमाणात नुकसान

दैनिक गोमन्तक डिजिटल

येथील दादा वैद्य चौकातील आचल टेक्सटाईल्स हे कपड्याचे दुकान आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. मंगळवारी संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास लागलेली आग रात्री साडेआठ वाजता आटोक्यात आली. आग विझवण्यासाठी फोंड्यासह इतर ठिकाणच्या अनिशामक दलाच्या बंबांना पाचारण करण्यात आले.

संध्याकाळी अचानक आग भडकली. शॉर्टसर्किटमुळे आग लागली असावी असा कयास व्यक्त करण्यात येत आहे. आगीची माहिती देताच अग्निशामक दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन आग विझवण्यासाठी प्रयत्न केले पण भडकलेल्या आगीत दुकानातील कपडे व इतर साहित्य जळून भस्म झाले.

या आगीत नुकसानीचा निश्चित आकडा समजू शकला नाही तरीपण लाखो रुपयांचे नुकसान झाले. दुकान लग्नसराईचे कपडे तसेच गणवेष व रेडिमेड कपडे जळून खाक झाले. दुकानाचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

या दुकानालगत असलेल्या दुकानांनाही आगीची झळ बसली पण सुदैवाने त्यांचे मोठे नुकसान झाले नाही. आग विझवण्यासाठी सहा बंबांचा वापर करण्यात आला. अधिक तपास सुरु आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

हाताशी आलेली भातशेती आडवी, पणजीत घराचे नुकसान; गोव्यात मान्सूनोत्तर पावसाचे धुमशान

आमदार दिलायला लोबोंचा भिंत बांधकामावर प्रत्युत्तर; आरोपांना दिले राजकीय हेतूचे वळण

Jamun Tree: सीतामाईच्या शोधात सह्याद्रीमध्ये रामाने मिठी मारलेला कच्छ, राजस्थान सोडून भारतभर आढळणारा 'जांभूळ वृक्ष'

Virat Kohli: दोन डकनंतर कोहलीचा पलटवार, सचिनचा 'सर्वात मोठा विक्रम' मोडत बनला व्हाईट-बॉलचा king

गोव्यात 'फर्जी' रुक्सुद्दीन सुलतान; लाखो बनावट अमेरिकी डॉलर्स छापल्याप्रकरणी भटकळ पोलिसांकडून अटक

SCROLL FOR NEXT