Recycling waste Dainik Gomantak
गोवा

असोल्डा, शेल्डे पंचायतीतर्फे ‘एमआरएफ’ सुविधा उपलब्ध

प्रदूषण नियंत्रण मंडळाला तपासणीचे निर्देश

दैनिक गोमन्तक

पणजी : राज्यातील कचरा विल्हेवाटप्रकरणी ‘एमआरएफ’ (मटेरिअल रिकव्हरी फॅसिलिटी) सुविधा असोल्डा व शेल्डे पंचायतीने उपलब्ध केल्या आहेत, त्याची तपासणी करण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाला दिले आहेत. ही सुनावणी कचराऱ्यासंदर्भातच्या श्‍वेच्छा याचिकेवरील सुनावणीसोबत येत्या 27 जूनला ठेवली आहे.

पंचायतींना कचरा विल्हेवाटीसाठीची केंद्रे (एमआरएफ) उभारण्याचे वेळोवेळी निर्देश देऊनही काही पंचायतींकडून त्याची गंभीर दखल न घेता दुर्लक्ष केले जात होते. काही पंचायती वेळोवेळी कारणे सांगून मुदतवाढ देण्याची विनंती करत होते. शेल्डे व असोल्डा या पंचायतींनी

एमआरएफ सुविधा उपलब्ध करण्यासाठी कोणतीच पावले उचलली नव्हती त्याची गंभीर दखल घेतली होती. ही ‘एमआरएफ’ सुविधा उपलब्ध करण्यासाठी महिन्याची मुदत दिली होती. या मुदतीत ती तयार न झाल्यास सरंपच व सचिवांना सुनावणीवेळी उपस्थित राहण्याचे निर्देश दिले होते. पंचायत निवडणूक आचारसंहिता या कामासाठी लागू नसेल असे स्पष्ट केले होते.

शेल्डे पंचायत सरपंच व सचिवांनीही एमआरएफी सुविधा तयार केल्याचे व ती सुरू करण्यात आल्याचे प्रतिज्ञापत्र सादर केले. ही सुविधाही प्रदूषण नियंत्रण मंडळाने तपासावी. दोन्ही पंचायतीच्या सरपंच व सचिवांनी दिलेल्या निर्देशानुसार एमआरएफ सुविधा उपलब्ध केल्याने सुनावणीवेळी उपस्थित राहण्याचे निर्देश रद्द करण्यात येत आहे असे आदेशात म्हटले आहे.

‘एमआरएफ सुविधेची योग्य तपासणी करावी’

असोल्डा पंचायतीच्या सरपंच व सचिवांनी न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर करून पंचायतीने एमआरएफ सुविधा तयार केली आहे. मात्र, ती कार्यान्वित झालेली नाही. ही सुविधा येत्या १५ जूनपासून कार्यान्वित केली जाईल. त्यामुळे प्रदूषण नियंत्रण मंडळाने एमआरएफ सुविधा योग्य प्रकारे तयार केली आहे की नाही याची तपासणी करण्यात यावी, असे मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने दिलेल्या आदेशात म्हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT