म्हापशात ‘पे-पार्किंग’साठी जादा शुल्कबाबत तक्रारी

गोवा कॅनने सुचवले आहे की, पे-पार्किंग सुविधेचे निरीक्षण करण्याचे काम हे रस्ता सुरक्षा आणि वाहतूक व्यवस्थापन समितीला दिले जाऊ शकते.
Pay Parking Charges in Mapusa, Goa
Pay Parking Charges in Mapusa, GoaDainik Gomantak
Published on
Updated on

म्हापसा : येथील पालिकेने बाजारपेठ तसेच टॅक्सी स्टॅण्डवर पे-पार्किंगची सुविधा केली असली तरी याठिकाणी ग्राहकांकडून जास्त शुल्क आकारले जात असल्याच्या तक्रारी येताहेत. यासंबंधी, या पे-पार्किंग सुविधेवर देखरेख यंत्रणा ठेवण्याची गरज असल्याची मागणी गोवा कॅनतर्फे समन्वयक रोलंड मार्टिन्स यांनी केली आहे.(Pay Parking Charges in Mapusa, Goa)

Pay Parking Charges in Mapusa, Goa
गोव्यात यलो अलर्ट जारी तर दिल्लीसह 'या' राज्यात उष्णतेच्या लाटेची शक्यता

यासंदर्भात गोवा कॅनने म्हापसा पालिकेचे मुख्याधिकारी सीताराम सावळ यांना निवेदन लिहिले आहे. या दोन्ही ठिकाणी पे-पार्किंगची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी पालिकेने योग्य पावले उचललेली आहेत. कारण, बाजारपेठेत भेट देणाऱ्या नियमित ग्राहक तसेच येणाऱ्या पर्यटकांसाठी ही सुविधा फायदेशीर आहे.

शिवाय पालिकेच्या महसुलात भर पडते. मात्र, या सुविधेवर लक्ष ठेवण्यासाठी देखरेख यंत्रणा स्थापित करावी लागेल. जेणेकरुन या सुविधेच्या वापरकर्त्यांकडून काही तक्रारी असल्यास किंवा कोणत्याही सुधारणा करायच्या असल्यास ते म्हापसा पालिकेस उपयुक्त ठरेल.

Pay Parking Charges in Mapusa, Goa
कॉंग्रेस बेकायदेशीर बांधकामाच्या मुद्द्यावरून सरकारला जाब विचारणार : पाटकर

गोवा कॅनने सुचवले आहे की, पे-पार्किंग सुविधेचे निरीक्षण करण्याचे काम हे रस्ता सुरक्षा आणि वाहतूक व्यवस्थापन समितीला दिले जाऊ शकते. जेणेकरून ते म्हापसा पालिकेला उर्वरित शहराच्या भविष्यातील योजनांमध्ये मदत करेल.

गोवा कॅनच्या पत्राच्या प्रती या उत्तर गोवा जिल्हाधिकारी, पोलीस वाहतूक उपअधीक्षक (उत्तर), नगरविकास संचालक तसेच वाहतूक, पर्यटन आणि नागरी पुरवठा आणि ग्राहक व्यवहारला पाठविल्या आहेत.

संपूर्ण माहितीविना फलक उभे

गोवा कॅनने या निवेदनात म्हटले आहे की, या जागांवर योग्य सूचना फलक (डिस्प्ले बोर्ड) बसवण्याची गरज आहे. जेणेकरून सुविधा घेणाऱ्या ग्राहकांना (दुचाकी व चारचाकी) पे-पार्किंगचे दर, वेळ तसेच तक्रारी असल्यास मोबाईल क्रमांक आणि ईमेल आयडी उपलब्ध करुन दिली पाहिजे. सध्या मार्केट आणि टॅक्सी स्टॅण्डवर लावलेल्या फलकांमध्ये संपूर्ण माहिती नाही किंवा ते योग्य स्थितीत नाहीत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com