Babush Monserrate
Babush Monserrate Dainik Gomantak
गोवा

Babush Monserrate: कचरा प्रकल्प नियोजित ठिकाणीच होणार!

गोमन्तक डिजिटल टीम

बायंगिणी येथे प्रथम कचरा प्रकल्प उभारला. त्याठिकाणी वस्ती नंतर निर्माण झाली. या प्रकल्पासाठी निविदा प्रक्रिया पूर्ण होत आली असून, दोनपैकी अद्ययावत तंत्रज्ञान असणारी कंपनी निवडली जाईल, असे सांगत कचरा व्यवस्थापन मंत्री बाबूश मोन्सेरात यांनी हा प्रकल्प नियोजित ठिकाणीच होणार असल्याचे पुन्हा स्पष्ट केले.

मंत्री म्हणून एक वर्ष पूर्ण झाल्यानंतर त्यांना अनेकांनी शुभेच्छा दिल्या. पत्रकारांशी संवाद साधताना ते म्हणाले, बायंगिणी प्रकल्पाचा केवळ तिसवाडीलाच नव्हे, तर इतर तालुक्यांनाही फायदा होणार आहे. बायंगिणी प्रकल्पात प्रतिदिन 100 मेट्रिक टन कचऱ्यावर प्रक्रिया होणार आहे. मात्र, हळूहळू त्याची क्षमता वाढवून तो 250 मेट्रिक टनवर नेला जाईल. हा प्रकल्प व्हावा, यासाठी मी सतत प्रयत्नशील राहिलो.

काकोडा प्रकल्पाचे लोकार्पण

वेर्णा येथे स्वीडनच्या सहकार्याने ई-वेस्ट विल्हेवाट प्रकल्प उभारण्यात येणार आहे. यासाठी स्वीडनच्या ‘आयव्हीएल’ संस्थेशी सरकारने करार केला असून या प्रकल्प परिसरात सौर ऊर्जा निर्माण होणार आहे.

काकोडा येथील प्रकल्प प्रायोगिक तत्त्वावर सुरू असून, लवकरच त्याचे लोकार्पण होणार आहे. या प्रकल्पामुळे कचरा विल्हेवाटीचा प्रश्‍न बऱ्याच प्रमाणात सुटणार आहे, असे बाबूश म्हणाले.

वास्तव समजून घ्या!

या प्रकल्पात तिसवाडीसह इतर मतदारसंघांतील कचराही प्रक्रियेसाठी येईल. कुंभारजुवेतील सर्व पंचायतींचा कचरा येथे येणार आहे. बायंगिणी येथे हा प्रकल्प आधी आला, त्यानंतर येथे इमारती उभारल्या गेल्या. स्थानिक आमदारांनी विरोध केला तरी त्यांनी वास्तव समजून घ्यावे, असे बाबूश मोन्सेरात म्हणाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Eco-Friendly Booth Video: गोव्यातील इको-फ्रेन्डली मतदान केंद्राची चर्चा; व्हिडिओ, फोटो व्हायरल

Goa Election 2024 Voting Live: राज्यात दुपारी तीनपर्यंत 61.39 टक्के मतदान

Goa Congress: पल्लवी धेंपे, सिद्धेश नाईक मंत्री ढवळीकर यांच्याविरोधात काँग्रेसची निवडणूक आयोगाकडे तक्रार

Israel Hamas War: रफाह शहराच्या सीमेजवळ इस्त्रायलची मोठी तयारी; ‘हा’ मुस्लिम मित्र देश संतापला; नेतन्याहू यांना दिला इशारा

गोवा निवडणूक काळात केजरीवालांचा सेव्हन स्टार हॉटेलमध्ये मुक्काम, कोणी दिले बिल? ED ची कोर्टात माहिती

SCROLL FOR NEXT