Bicholim News : डिचोली, कारापूर-सर्वण पंचायत क्षेत्रात पुन्हा एकदा कचऱ्याच्या समस्येने डोके वर काढले असून बहुतेक सूचना फलकही गायब झाले आहेत. विशेष म्हणजे पंचायतीतर्फे घरोघरी कचऱ्याची उचल होत असली, तरी उघड्यावर कचरा टाकण्याचे प्रकार चालूच आहेत.
उघड्यावर आणि रस्त्याच्या बाजूने कचरा टाकणाऱ्या विरोधात पंचायतीने दंडात्मक कारवाई करावी, अशी सामान्य जनतेची मागणी आहे.
कारापूर-तिस्क, कुळण, गोकुळवाडा, न्यू वाडा, सर्वण आदी भागात कचऱ्याची समस्या आहे. पंचायतीतर्फे साफसफाई केली, की काही दिवस परिसर स्वच्छ दिसून येतात. नंतर पुन्हा कचरा समस्या डोके वर काढते. हा कचरा कोठून येतोय आणि कोण टाकतोय त्याबद्दल गूढ निर्माण होत आहे.
कचरा समस्येवर नियंत्रण यावे. यासाठी पंचायतीचे प्रयत्न चालू आहेत.अशी माहिती सरपंच दत्तप्रसाद खारकांडे यांनी दिली. ही समस्या मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या कानावर घालण्यात आली आहे. असेही त्यांनी सांगितले.
डिचोली-साखळी मुख्य रस्त्याला जोडून सर्वण गावाकडे जाणाऱ्या अंतर्गत रस्त्याच्या बाजूने तर पुन्हा कचरा टाकण्याचे प्रकार वाढले आहेत. सर्वण उतरणीवरील रस्त्यावर तर सध्या प्लास्टिक कचरा मोठ्या प्रमाणात साचला आहे.
सूचना फलक गायब
कारापूर- सर्वण पंचायत क्षेत्रात ज्या ठिकाणी कचरा टाकण्यात येत आहे. त्या ठिकाणी तीन वर्षापूर्वी स्थानिक पंचायतीने ''कचरा टाकू नये'' अशा आशयाचे सूचना फलक लावले होते.
त्यानंतर काही दिवस कचरा टाकण्याच्या प्रकारावर नियंत्रण होते. आता तर बहुतेक ठिकाणचे सूचना फलकच गायब झाले आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.