Garbage in Saligaon Plant Dainik Gomantak
गोवा

बार्देशातील 19 पंचायतींचा ओला कचरा साळगावमध्‍ये

अन्य 14 पंचायतींकडून स्‍वत:च आपआपल्‍या क्षेत्रात कचऱ्याची विल्हेवाट

दैनिक गोमन्तक

म्हापसा : बार्देशमधील 33 पैकी 19 पंचायती स्वत:च्या कार्यकक्षेतील ओला कचरा सध्या साळगाव कचरा प्रक्रिया प्रकल्पात पाठवत आहेत. तर, अन्य 14 पंचायती स्‍वत:च आपल्‍या क्षेत्रात कचऱ्याची विल्हेवाट लावत आहेत. या 33 पंचायतींपैकी केवळ तीन पंचायतींनी सुक्या कचऱ्यासाठी पुनर्प्रक्रिया यंत्रणा उभारण्याच्या बाबतीत अद्याप पावले उचलली नाहीत. (Garbage in Saligaon Plant News Updates)

बस्तोडा पंचायतीने कचरा प्रक्रिया प्रकल्प स्थापन करण्यासाठी स्थानिक कोमुनिदादच्या मालकीची जमीन निश्चित केली आहे; परंतु कोमुनिदादने अजूनही त्याबाबत ‘ना हरकत’ दाखला दिलेला नाही. त्या प्रकल्पासंदर्भातील निर्णय सध्या पंचायत संचालनालयाकडे प्रलंबित आहे. हळदोणे आणि पोंबुर्फा-वळावली या दोन्ही पंचायतींनी जागेअभावी अशा स्वरूपाचे प्रकल्प उभारण्याबाबत विलंब केलेला आहे.

प्रामुख्याने उत्तर गोव्यातील (North Goa) किनारीपट्ट्यातील कचऱ्यावर प्रक्रिया करण्याच्या उद्देशाने राज्य सरकारने साळगाव येथे घनकचरा प्रकल्प उभारला आहे. अलीकडेच त्या प्रकल्पाची क्षमता प्रतिदिन 250 टन एवढी वाढविण्‍यात आलेली आहे. त्यामुळे किनारपट्टी भागातील कचऱ्याची विल्हेवाट आणि प्रक्रिया करणे सुलभ झाले आहे.

साळगाव येथील प्रकल्पात स्वत:च्या क्षेत्रातील ओला कचरा पाठवणाऱ्या पंचायतींमध्ये कळंगुट, कांदोळी, हडफडे-नागवा, साळगाव, पिळर्ण, रेईश-मागूस, सांगोल्डा, नेरुल, सुकूर, साल्वादोर-द-मुन्द, पेन्ह-द-फ्रान्स, हणजूण-कायसूव, पर्रा, गिरी, आसगाव, मार्ना-शिवोली (Siolim), मयडे, हळदोणे, वेर्ला-काणका या 19 पंचायतींचा समावेश आहे.

अस्नोडा, बस्तोडा, कामुर्ली, कोलवाळ, नास्नोडा, नादोडा, ओशेल-शिवोली, पीर्ण, पोंबुर्पा-वळावली, रेवोडा, सडये-शिवोली, शिरसई, थिवी व उसकई-पालये-पुनोळा या 14 पंचायत क्षेत्रांतील ओला कचरा (Garbage) साळगाव प्रकल्पात अद्याप पाठवला जात नाही. त्या पंचायतींकडून ग्रामस्थांना त्यांच्या घराच्या परिसरातच कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी प्रोत्साहित केले जात आहे. त्यादृष्टीने संबंधित घरांच्या परिसरात कंपोस्टिंग खड्डे खोदण्यात आलेले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT