Garbage on Road Dainik Gomantak
गोवा

Garbage Issue: समस्या सुटता सुटेना! मेरशी-सांताक्रुज बायपासवर कचऱ्याचे साम्राज्य

राज्यातील कचऱ्याची समस्या दिवसेंदिवस गहन होत चालली आहे.

Kavya Powar

राज्यातील कचऱ्याची समस्या दिवसेंदिवस गहन होत चालली आहे. ठिकठिकाणी रस्त्याच्या कडेला कचऱ्याचे ढीग साठल्याने वातावरणात दुर्गंधी पसरत चालली आहे. मेरशी-सांताक्रुज बायपास परिसर पणजी - मडगाव/वास्को वाहतुकीसाठी अत्यंत महत्वाचा मार्ग आहे. पण या मार्गावर कचऱ्याचे साम्राज्य पसरले असल्याची तक्रार वाहनचालक आणि रहिवासी करत आहेत.

मेरशी तसेच सांताक्रुज ग्रामपंचायत कर आकारून घरोघरी जाऊन कचरा गोळा करत असतानाही महामार्गावर दुर्गंधीयुक्त कचरा टाकण्यात येत आहे. रहिवाशांनी याबाबत नाराजी व्यक्त केली असून पंचायतीने कारवाई करून कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावण्याची विनंती केली आहे.

पंचायतीच्या बैठकीत रहिवाशांनी आपल्या या तक्रारी मांडल्या असून परिसरावर लक्ष ठेवण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याची विनंती केली आहे. परंतु अद्याप ही उपाययोजना लागू करण्यात आलेली नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT